शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोकेन प्रकरण; तिसर्‍या आरोपीस तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:34 IST

अकोला : कोकेन जप्ती प्रकरणात कोकेनची खरेदीमध्ये सहभागी असलेल्या तिसर्‍या आरोपीस न्यायालयाने सोमवारी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. रितेश संतानी असे या कोकेन खरेदीदाराचे नाव आहे.

ठळक मुद्देकोकेनची खरेदीमध्ये सहभागी असलेल्या तिसर्‍या आरोपीस जामीनरितेश संतानी असे कोकेन खरेदीदाराचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोकेन जप्ती प्रकरणात कोकेनची खरेदीमध्ये सहभागी असलेल्या तिसर्‍या आरोपीस न्यायालयाने सोमवारी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. रितेश संतानी असे या कोकेन खरेदीदाराचे नाव आहे.अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांसाठी आणण्यात येणारे ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून जप्त केले होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत १0 लाख रुपये असून, राज्यातील किंमत दोन लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (१९) याला अटक केली होती. हिरोळे हा मुंबईतील ‘जेम्स’ नामक व्यक्तीकडून कोकेनची खरेदी करीत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानंतर यामध्ये अकोल्यातील सिंधी कॅम्पमधील विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश कन्हैयालाल संतानी या दोघांची नावे समोर आली. पोलिसांनी या दोघांच्या अटकेचा प्रयत्न केला; मात्र त्यांना माहिती होताच विक्की धनवानी याने आधीच अटकपूर्व जामीन मिळविला. त्यानंतर सोमवारी रितेश संतानी यालाही न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आणखी काही आरोपी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आणखी पाच आरोपींची नावे पोलिसांनी निश्‍चित केले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाईचा फास आवळल्या जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.