शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोकेन प्रकरण; नायजेरियन आरोपीचा गुन्हा मुक्तीचा अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:54 IST

अकोला : कोकेन जप्त प्रकरणातील आरोपी नायजेरियाचा लुकेचिके एन्जीओवा याचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आता गुन्हा मुक्त करण्यासाठी प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

ठळक मुद्देयालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आता प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोकेन जप्त प्रकरणातील आरोपी नायजेरियाचा लुकेचिके एन्जीओवा याचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आता गुन्हा मुक्त करण्यासाठी प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. शहरातील श्रीमंत कुटुंबातील युवकांसाठी आणण्यात येणारे ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी जप्त केले होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत १0 लाख रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (वय १९ गुलजारपुरा) याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मुंबईतील लुकेचिके एन्जीओवा याचे नाव समोर आले होते. तीन महिन्यांपूर्वी रामदासपेठ पोलिसांनी लुकेचिके एन्जीओवा मुंबईतून अटक केली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर सिंधी कॅम्प परिसरातील विक्की व रितेश संतानी यांनी कोकेन मागविल्याची माहिती समोर आली होती. आरोपी लुकेचिके एन्जीओवा हा तीन महिन्यांपासून कारागृहात आहे. त्याने न्यायालयात गुन्हा मुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे. गुरुवारी त्याची बाजू अँड. पप्पू मोरवाल, अँड. दुबे यांनी मांडताना पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये लुकेचिके एन्जीओवा याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. केवळ त्याचा जबाब नोंदविला आहे. आरोपीकडून पोलिसांनी कोकेन जप्त केलेले नाही. त्याचा मोबाइल, कॉल रेकॉर्डिंग जप्त केलेले नाही, असा युक्तिवाद करून त्याला गुन्हय़ातून मुक्त करण्याची मागणी केली. 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय