शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय अभ्यासक्रमात होणार कृषी विषयाचा अंतर्भाव!

By admin | Updated: April 16, 2016 02:08 IST

कृषिमंत्री जाणून घेणार कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूं कडून माहिती.

राजरत्न सिरसाट/अकोला

          शेतीविषयक माहिती विद्यार्थ्यांना शिक्षणातून अनुभवता यावी, या अनुषंगाने शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा अंतर्भाव करण्याबाबत शासन विचार करीत असून, याबाबत विद्यमान कृषिमंत्र्यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची मते जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली होती. तथापि, काही अपरिहार्य कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. कृषी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास कृषी पदवीधरांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि ग्रामीण भागात कुशल मनुष्यबळ निर्मिती शक्य असल्याने, शासन या विषयावर गांभीर्याने विचार करीत आहे.कृषिप्रधान देशात शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय नसावा, हेच मुळात न पटणारे असल्याने तत्कालीन राज्य शासनाने या विषयावर समिती नेमली होती. नंतर मात्र या विषयावर चर्चाच झाली नसल्याने हा विषय मागे पडला; परंतु सध्या देशात उद्भवलेली स्थिती आणि शेतीकडे युवा शेतकर्‍यांचा ओढा बघता, कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच कृषी विषयाचे शिक्षण मिळणे क्रमप्राप्त आहे. याबाबत राज्य शासन अनुकूल असून, या अनुषंगाने कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू ंची बैठक बोलावली होती. या बैठकीत शालेय शिक्षणात कृषी विषय समाविष्ट करण्यासंदर्भात कृषिमंत्री चर्चा करणार होते. तथापि, काही अपरिहार्य कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून, ही बैठक लवकरच होणार असल्याचे वृत्त आहे.डॉ. देशमुख समितीचा अहवाल कागदावरच शालेय अभ्याक्रमात कृषी विषय अनिवार्य करण्यासाठी राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. डॉ. देशमुख समितीने यासंदर्भातील अहवाल शासनाला सादर केला होता. तथापि, त्यानंतर या अहवालावर कोणतीच चर्चा झाली नाही.