अकोला: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी अकोला दौर्यावर येत आहेत. सकाळी ९ वाजता अकोला विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. ९.१५ वाजता जठारपेठ चौक येथे गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन व संसदीय कार्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १0 वाजता डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आयोजित २९ व्या दीक्षांत समारंभास मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहतील. तेथून दुपारी १२ वाजता अकोला विमानतळाकडे प्रयाण आणि १२.१५ वाजता विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.
मुख्यमंत्री आज अकोल्यात
By admin | Updated: February 5, 2015 01:45 IST