शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, पुरवठा मंत्र्यांना फासावर चढवा - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:38 IST

अकोला : राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले; परंतु तुरीला भाव नाही. नाफेडच्या तूर खरेदीसाठी जाचक अटी लादल्या आणि दुसरीकडे भाजप सरकारने परदेशातून १३५ रुपये किलो दराप्रमाणे तूर आयात केली. हा सारा प्रकार शेतकर्‍यांची फसवणुक करून त्यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त करणारा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पुरवठा मंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शेतकरी हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला. 

ठळक मुद्देशेतकरी जागर यात्रा अकोल्यात परदेशातून तूर आयात करण्याची गरज काय?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले; परंतु तुरीला भाव नाही. नाफेडच्या तूर खरेदीसाठी जाचक अटी लादल्या आणि दुसरीकडे भाजप सरकारने परदेशातून १३५ रुपये किलो दराप्रमाणे तूर आयात केली. हा सारा प्रकार शेतकर्‍यांची फसवणुक करून त्यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त करणारा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पुरवठा मंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शेतकरी हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला. महाराष्ट्रातील ४0 शेतकरी संघटनांची असलेली सुकाणू समितीच्यावतीने शहिद दिन २३ मार्च रोजी हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली. ही यात्रा शुक्रवारी दुपारी अकोल्यात पोहोचली. यावेळी शासकीय विश्रामगृहात सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले असताना, परदेशातून तूर आयात करण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करीत, तूर खरेदीत मोठा घोटाळा या सरकारने केला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारचे धोरण भाग पाडत आहे. शेतकर्‍यांची ५0 रुपये किलो दराने तूर खरेदी करण्यास सरकार तयार नाही आणि परदेशातून १३५ रुपये किलो दराने तूर आयात केली जाते. शेतकर्‍यांच्या मालाला आधारभूत भाव देऊ आणि ५0 टक्के नफा देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते; परंतु शेतकर्‍यांना आधारभूत भाव तर मिळालाच नाही, उलट मोदींच्या सत्ताकाळात ३५ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. त्यामुळेच शेतकर्‍यांना जागरूक करण्यासाठी शेतकरी संघटनेने जागर यात्रा काढली. सत्ताधारी व विरोधी पक्ष मिळून खाताहेत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षांनी काहीही केलेले नाही. शेतकर्‍यांविषयी कोणालाही कळवळा नाही. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे चारही पक्ष उद्योगपतींच्या पैशांवर चालत असल्याचाही आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांच्यावतीने  प्रत्येक जिल्हय़ात १0 मे रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करून जेलभरो करण्यात येईल, अशी माहिती यांनी यावेळी दिली. पत्रपरिषदेला कष्टकरी शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष कापुसदे, दिनकर दाभाडे, कालिदास आपेट, किशोर ढमाले उपस्थित होते. 

भाजपचा मेळावा म्हणजे पैशांचा चुराडाशेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी व वीज बिल माफीसाठी यांच्याकडे पैसा नाही आणि भाजपच्या मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. हा जनतेच्या पैशांचा दुरुपयोग आहे, असा आरोप करीत रघुनाथ पाटील यांनी, आगामी निवडणुका भाजप केवळ पैशांच्या भरवशावरच लढणार आहे, असेही ते म्हणाले.-

टॅग्स :Akolaअकोला