शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादनास मुख्यमंत्र्यांची तत्त्वत: मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:46 IST

विमानतळ विस्तारीकरणाची उपयुक्तता तपासून यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अकोला : अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी २२ हेक्टर खासगी जमीन संपादनाच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देत, विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात उपयुक्तता तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.अकोल्याचे शिवणी विमानतळ भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या मालकीचे असून, सध्या या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ हजार ४०० मीटर व रुंदी ४५ मीटर आहे. या विमानतळावर ‘एटीआर-४२’ प्रकारची विमाने उतरण्याची सोय आहे. तथापि, विमानतळावर ‘एटीआर-७२’ प्रकारची विमाने उतरण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ हजार ८०० मीटरपर्यंत वाढविणे प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने विमानतळ विस्तारीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ६०.६८ हेक्टर जमिनीचा ताबा भारतीय विमान पत्तन प्राधिकरणला देण्यात आला आहे; मात्र २२ हेक्टर खासगी जमीन संपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार, ७ फेबु्रवारी रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणाच्या मुद्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून माहिती घेतली. त्यानुसार विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादन करण्याच्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तथापि, विमानतळ विस्तारीकरणाची उपयुक्तता तपासून यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.खासगी जमीन संपादनाचा असा आहे प्रस्ताव!अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी २२ हेक्टर खासगी जमीन संपादन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८० कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAirportविमानतळ