शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघ मार्चअखेर करणार कापूस खरेदी केंद्रे बंद!

By admin | Updated: March 8, 2016 02:49 IST

बाजारात २२0 लाख गाठी कापूस खरेदी ; सव्वाशे लाख गाठींची व्यापा-यांकडे साठवणूक.

राजरत्न सिरसाट/अकोलायावर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने अल्पभूधारक, छोट्या शेतकर्‍यांकडील कापूस जवळपास संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ व भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) ची कापूस खरेदी केंद्रेही ठप्प पडली आहेत. परिणामी मार्चअखेर कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला आहे. दरम्यान, खाजगी बाजारात आजमितीस २२0 लाख गाठी कापूूस शेतकर्‍यांनी विकला असून, जवळपास १२५ लाख गाठीहून अधिक कापूस व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवूण ठेवल्याचा अंदाज आहे.महाराष्ट्रात यावर्षी ६५ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत येथील शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील जवळपास कापूस विकला आहे, तर येथील २५ टक्के व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस साठवून ठेवल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पणन महांसघाने यावर्षी अडीच लाख क्विंटल, तर सीसीआयने साडेपाच लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. दरम्यान, देशातील खासगी बाजारात जवळपास २२0 लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे. यावर्षी देशांतर्गत ३५६ ते ३५८ लाख गाठी कापूस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आहे. आतापर्यंत २२0 लाख गाठी कापसाची खरेदी झाल्याने जवळपास १२५ लाख गाठीच्यावर कापूस अद्याप बाजारात यायचा आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कापूस विकल्याने, १२५ लाखांच्यावर कापसाच्या ज्या गाठी आहेत, त्या व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवून ठेवल्या आहेत. यात काही सधन शेतकर्‍यांचाही समावेश आहे. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने यावर्षी कापसाचे हमीदर ४१00 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केले. तथापि, महाराष्ट्रात प्रतवारीचे निकष लावून ह्यझोडाह्णच्या नावाखाली अनेक ठिकाणी ३५00 रुपये क्विंटल दराने अल्पभूधारक शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करण्यात आला. आर्थिक गरजेपोटी अल्पभूधारक शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना कापूस विकला आहे.