शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

महापोर्टल बंद; परीक्षार्थींच्या शुल्काचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 19:28 IST

आता हे पोर्टलच बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्काचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

अकोला : राज्य शासनाने नोकर भरतीसाठी सुरू केलेले महापोर्टल बंद केले आहे. या पोर्टल संदर्भात तक्रारी करणाऱ्यांना या निर्णयाने समाधान झाले असले तरी राज्य सरकारच्या सात विभागांतील भरतीकरिता ३४ लाखांवर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सशुल्क अर्ज दाखल केले होते. आता हे पोर्टलच बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्काचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच असल्याने नव्या भरती प्रक्रियेदरम्यान या शुल्काचा विचार व्हावा, अन्यथा सदर शुल्क परत करावे, अशी मागणी होत आहे.राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने १९ सप्टेंबर २१७ रोजी एका अध्यादेशाद्वारे महापोर्टलची स्थापना केली होती. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील भरती प्रक्रिया राबविण्याचे काम महापोर्टलकडे देण्यात आले होते. राज्य सरकारने एप्रिल २०१९ मध्ये विविध खात्यांतील ३२ हजार पदांसाठी जाहिरात काढली होती. याकरिता महापोर्टलकडे ३४ लाखांवर अर्ज आले. एक अर्ज भरण्यासाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्याला ५०० रुपये शुल्क होते. इतर सर्व आरक्षित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३५० रुपये शुल्क होते. आता महापोर्टल बंद करण्यात आल्याने ३४ लाख विद्यार्थ्यांच्या पैशांचे काय, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. सरकारने महापोर्टलकडे विद्यार्थ्यांकडून भरती अर्ज शुल्कापोटी घेतलेल्या १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम आणि त्यावरच्या व्याजावर भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.बॉक्स...महाआयटीच्या भरती प्रक्रियेत शुल्क ग्राह्य धरणार का?नवीन अध्यादेशानुसार सरकारच्या विविध विभागाच्या गट-क आणि गट-ड आदी पदभरती संदर्भात परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या परीक्षांसाठी महापोर्टलवर भरलेले शुल्क ग्राह्य धरावा अन्यथा शुल्क परत करावे, अशी मागणी विशाल राऊत, रवी दामोधर, गोपाळ काळे, अभिषेक जाधव आदी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आल्यामुळे मीसुद्धा महापोर्टल बंद व्हावे, ही मागणी रेटून धरली होती. पोर्टल बंद झाले, हे चांगलेच आहे; मात्र आता विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्काबाबत मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाशी बोलून निर्णय घेता येईल. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये, हाच सरकारचा प्रयत्न असला पाहिजे, या मताचा मी आहे.-ओमप्रकाश ऊर्फ बच्च कडू,शालेय शिक्षण राज्यमंत्री.

 

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू