शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील फेरीवाल्यांच्या कर्जाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 10:38 IST

मनपा प्रशासनाने तातडीने ‘पीएम अंमलबजावणी कृती समिती’च्या बैठकीचे आयोजन करून बँक ांना कर्ज देण्याचे निर्देश दिले.

अकोला : केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर निधी’ योजनेंतर्गत शहरातील नोंदणीकृत २ हजार ५८९ फेरीवाले, लघुव्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. योजना मंजूर झाल्यावरही कर्ज देण्यासंदर्भात फेरीवाले व बँकांच्या स्तरावर संभ्रम असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर मनपा प्रशासनाने तातडीने ‘पीएम अंमलबजावणी कृती समिती’च्या बैठकीचे आयोजन करून बँक ांना कर्ज देण्याचे निर्देश दिले.कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून केंद्र व राज्य शासनाने २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली होती. यादरम्यान, सर्व उद्योग-व्यवसाय कोलमडल्याची स्थिती असून, रस्त्यालगत लघुव्यवसाय उभारणाऱ्या व्यावसायिकांसह फेरीवाले उघड्यावर आले आहेत. ही बाब पाहता केंद्र शासनाने फेरीवाल्यांसाठी ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेची घोषणा केली. यामध्ये संबंधित व्यावसायिकांना दहा हजार रुपये कर्ज देण्याची तरतूद करण्यात येऊन राष्ट्रीयीकृत बँकांसह सर्वच मान्यताप्राप्त बँकामधून कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश आहेत. केंद्र शासनाने सदर योजनेची घोषणा केली असली तरीही यासंदर्भात महापालिका आणि बँकांच्या स्तरावर संभ्रमाची स्थिती असल्याचे निदर्शनास आले. या विषयाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर मनपाच्या स्तरावर तातडीने ‘पीएम अंमलबजावणी कृती समिती’चे गठन करण्यात येऊन समितीमधील सदस्य व फेरीवाले, लघुव्यावसायिकांच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन केले. मनपाच्या मुख्य सभागृहात सहायक आयुक्त पूनम कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली असता उपस्थित बँक अधिकारी यांना मनपाने नोंदणीकृत केलेल्या फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

फेरीवाल्यांनो काळजी करू नका!फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मनपाने बायोमेट्रिक प्रणालीद्वारे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ठाणे येथील सेवादल संस्थेची नियुक्त ी केली होती. या संस्थेकडे २४७ फेरीवाल्यांचे प्रस्ताव मनपाकडे पडून आहेत. असे असले तरी ‘आत्मनिर्भर’ योजनेसाठी मनपाने काही फेरीवाल्यांची नावे सुचविल्यास ते कर्जासाठी पात्र ठरणार आहेत.

‘आॅनलाइन’ अर्ज स्वीकृतीपुढील आठवड्यात मनपाच्या पोर्टलद्वारे आॅनलाइन अर्ज स्वीकृत केल्या जातील. संबंधित बँकांकडे अर्ज सादर करावे लागतील. पडताळणीनंतर कर्जाची रक्कम अदा केली जाईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका