शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

अकोला शहरात साफसफाईच्या कामाची ऐशीतैशी; नाल्या-गटारे तुंबली; अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:33 PM

अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसाफसफाईसंदर्भात आरोग्य विभागाचा गलथान कारभार पाहता ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रभागांमधील चित्र पाहता, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.

अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रशासकीय प्रभागांसह पडीत प्रभागांची अवस्था अत्यंत केविलवाणी असून, नागरिकांच्या हिताचा आव आणणारे महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आणि नगरसेवक आहेत तरी कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. साफसफाईसंदर्भात आरोग्य विभागाचा गलथान कारभार पाहता ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.अकोलेकरांना साफसफाई, पथदिवे, पाणी पुरवठा, रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. मनपाच्या आस्थापनेवर ७४८ सफाई कर्मचारी असून, त्यांची प्रशासकीय प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून, बहुतांश कर्मचाºयांना जाणीवपूर्वक कार्यालयांमध्ये नियुक्त केले आहे, तर २३ प्रभागांमध्ये (पडीत) खासगी तत्त्वावर प्रत्येकी १५ सफाई कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. पडीत प्रभागांमध्ये १५ पैकी केवळ ४ ते ५ खासगी कर्मचाºयांच्या माध्यमातून केवळ सर्व्हिस लाइनची स्वच्छता करण्याचे काम केले जाते. बहुतांश पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट नगरसेवक किंवा त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांनी मिळविले आहे. यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, बाजारपेठ, खुली मैदाने तसेच प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रभागांमध्ये ठिकठिकाणी काटेरी झुडुपे वाढली असून, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. प्रभागांमधील साफसफाईची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाºयांची असली, तरी प्रभागांमधील चित्र पाहता, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.आरोग्य निरीक्षक नव्हे, पांढरे हत्ती!प्रभागातील दैनंदिन साफसफाईची पाहणी करून तसा अहवाल क्षेत्रीय अधिकाºयांकडे सादर करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश आरोग्य निरीक्षक नगरसेवकांच्या इशाºयानुसार काम करतात. शहरात स्वच्छतेची समस्या लक्षात घेता, आरोग्य निरीक्षक पांढरे हत्ती बनल्याचे चित्र आहे. प्रभागांमध्ये घाण, अस्वच्छता आढळून आल्यास आरोग्य निरीक्षकांचे वेतन कपात करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका