अकोला: जुना भाजी बाजारात घाणीमुळे गच्च भरलेल्या नाल्यांची उशिरा का होईना महापालिका प्रशासनाने दखल घेतली. मंगळवारी मनपाच्या स्वच्छता विभागाने या ठिकाणी साफसफाई करीत परिसरातील किरकोळ अतिक्रमण हटविले. जैन मंदिरालगतच्या जुना भाजी बाजार परिसरातील नाल्यांची मे महिन्यात मान्सूनपूर्व साफसफाई होणे अपेक्षित होते. शहरात पहिल्यांदाच प्रभागनिहाय नाले सफाई होणार असल्याचा दावा करीत मनपाच्या स्वच्छता विभागाने २४५ नाले सफाईची निविदा प्रक्रिया राबवली. मध्यंतरी आलेल्या पावसाने नाले सफाईची चांगलीच ह्यपोलखोलह्णकेली. जुना भाजी बाजारात प्रचंड प्रमाणात घाण साचते. दुकानांलगतच्या नाल्यांवर व्यावसायिकांनी धापे टाकल्यामुळे या समस्येत अधिकच भर पडली आहे. घाणीमुळे नाले गच्च भरल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. यासंदर्भात काही सुज्ञ व्यावसायिकांनी मनपाकडे तक्रारी केल्यानंतर स्वच्छता विभागाने या भागात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी दुकानांसमोरील धापे हटवून नाल्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी व कर्मचारी उपस्थित होते.
जुना भाजी बाजारात नाले सफाई
By admin | Published: August 26, 2015 1:42 AM