शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

‘स्वच्छ सर्वेक्षण’; अकोला मनपा देशात ६६ व्या क्रमांकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:03 IST

अकोला महापालिकेला देशातून ६६ वा क्रमांक प्राप्त झाला असून, राज्यात मनपाने २१ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ मध्ये अकोला महापालिकेला देशातून ६६ वा क्रमांक प्राप्त झाला असून, राज्यात मनपाने २१ व्या स्थानावर झेप घेतली आहे. २०१९ मधील स्वच्छ सर्वेक्षणच्या निकालात देशात मनपाचा २१७ वा क्रमांक होता. त्या तुलनेत ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदारीमुक्त करण्याचे अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये महापालिकेला हगणदरीमुक्त शहराचा दर्जा प्राप्त झाला होता. यानंतर वेळोवेळी राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८, २०१९ व आता २०२० मधील अभियानांतर्गत शहरामध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्यास संदर्भात शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. या अभियानात राज्यातील महापालिका सहभागी झाल्या होत्या. त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून भारतीय गुणवत्ता परिषदेचे (क्यूसीआय) पथक शहरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले असता स्वच्छतेबाबत नागरिकांशी संवाद साधून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनातर्फे केल्या जाणाºया उपाययोजनांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. त्यानुषंगाने संपूर्ण देशातून महापालिकेला ६६ वा क्रमांक प्राप्त झाला असून, राज्यातून २१ वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ मध्ये २१७ वा क्रमांककेंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०१९’ मध्ये सहभागी झालेल्या मनपाला देशातून २१७ वा क्रमांक मिळाला होता. यादरम्यान, प्रशासनाने स्वच्छतेच्या मुद्यावर विविध उपाययोजना केल्याचे परिणाम यंदा समोर आले असून, देशातून ६६ वा क्रमांक प्राप्त झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

स्वच्छतेच्या संदर्भात मनपातर्फे घरोघरी कचरा जमा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा ट्रॅक्टरच्या माध्यमातून उचलल्या जातो. नागरिकांनी उघड्यावर कचरा न फेकता वाहनात जमा करावा. परिसरात स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे.- अर्चना मसने, महापौर

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान