शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ : अमरावती विभागात एकमेव अकोला महापालिकेला एक स्टार मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 10:34 IST

महापालिका क्षेत्रात स्वच्छता राखण्याच्या मानांकनात अमरावती विभागातून एकमेव अकोला महापालिकेला एक स्टार मानांकन मिळाले आहे.

अकोला: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या  स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये महापालिका क्षेत्रात स्वच्छता राखण्याच्या मानांकनात अमरावती विभागातून एकमेव अकोला महापालिकेला एक स्टार मानांकन मिळाले आहे.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदरीमुक्त करण्याचे अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये महापालिकेला हगणदरीमुक्त शहराचा दर्जा प्राप्त झाला होता. यानंतर वेळोवेळी राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८, २०१९ व आता २०२० मधील अभियानांतर्गत शहरांमध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये कचरामुक्त शहरांकरिता स्टार गुणांकन निश्चित करण्यात आले होते. या अभियानात राज्यातील नगरपालिका व महापालिका सहभागी झाली होती. त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून भारतीय गुणवत्ता परिषदेचे (क्यूसीआय)पथक शहरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. स्वच्छतेबाबत नागरिकांशी संवाद साधून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. तपासणीअंती महापालिकेला कचरामुक्त शहर (जी.एफ.सी.) याबाबत एक ‘स्टार’ मानांकन देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निकालानुसार सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या ७० शहरांमधून ४१ शहरांना १ स्टार मानांकन देण्यात आले असून, यामध्ये अमरावती विभागातून सहभागी झालेल्या महापालिकेतून एकमेव अकोला महापालिकेचा समावेश आहे.नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून मानांकनशहरातील दैनंदिन स्वच्छतेच्या कारभारासंदर्भात क्यूसीआयच्या चमूने नागरिकांसोबत प्रत्यक्षात संवाद साधण्याची माहिती मनपाच्यावतीने देण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून स्वच्छ सर्वेक्षणाचे मानांकन ठरल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका