शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एसपींकडून क्लीन चीट, डीवायएसपी म्हणतात, जामीन नको!

By admin | Updated: April 28, 2017 02:01 IST

चिमुकलीचे लैंगिक शोषण: चेहरा साधर्म्यामुळे युवकाला पकडले!

अकोला : टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्सच्या छतावर दहा वर्षीय चिमुकलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंध नसतानाही केवळ चेहरा साधर्म्यामुळे मुख्य आरोपी सोडून निर्दोष युवक प्रवीण ऊर्फ पड्या चव्हाण याला अटक केली; परंतु नंतर पोलीस अधीक्षकांनी प्रवीण हा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी नसल्याचे पत्रपरिषदेत स्पष्ट केले; मात्र पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी प्रवीणने केलेला जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर करावा, अशी विनंती केली. पोलिसांच्या चुकीमुळे एका निर्दोष युवकावर संकट ओढावल्यानंतरही पोलीस त्याच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळत असल्याचे हे उदाहरण आहे. एका दहा वर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर नेऊन निर्जनस्थळी तिच्यावर नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. रामदासपेठ पोलिसांनी सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपींची धरपकड सुरू केली. संशयितांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केल्यानंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण (रा. माळीपुरा) यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध भिकारी गोविंद साखरे याला अटक केली. त्याच्याकडून मुख्य आरोपींची नावे मिळाली. पोलिसांनी मुख्य आरोपी व प्रवीणच्या चेहऱ्यामध्ये बरेच साम्य असल्याने त्याला अटक करावी लागली. त्याचा घटनेशी संबंध नाही, असे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले होते. पोलिसांच्या चुकीमुळे निष्पाप प्रवीण चव्हाणला विनाकारण पोलीस कारवाईला सामोरे जाऊन गजाआड व्हावे लागले. प्रवीण सध्या कारागृहात असून, त्याने अ‍ॅड. केशव एच. गिरी यांच्या माध्यमातून न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला; परंतु न्यायालयाने त्यावर पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यावर पोलीस अधीक्षक उमेश माने पाटील यांनी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली. पोलीस अधीक्षक एकीकडे प्रवीणला निर्दोष ठरवितात, तर दुसरीकडे त्यांचेच पोलीस उपअधीक्षक प्रवीण पीडित मुलीस धमकावू शकतो, तपासामध्ये हस्तक्षेप करून पुरावे नष्ट करू शकतो, असे म्हणून त्याला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, हे हास्यास्पद आहे.