शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसांग येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:39 IST

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.

ठळक मुद्देगायरान जमिनीचा वाद चिघळला१0 जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.म्हैसांग येथील सर्व्हे नं २५ मध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात  उत्तरेला जवळपास ७५ एकर गायरान जमीन आहे. त्या  जमिनीवर गावातील काही लोकांनी मागील १५ वषार्ंपासून  अतिक्रमण केले असून, त्यावर ते लोक पीक घेतात; परंतु  गावातील नागरिकांनी त्यांच्या जनावरांना चरायला  गायरानाची जमीन शिल्लक नसल्याने ग्रामपंचायतीला ते  अतिक्रमण काढण्यास सांगितले. त्यानुसार सन २0१२ मध्ये  ग्रामपंचायतीने गायरानावरील अतिक्रमकांना जमीन खाली  करण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. त्याला विरोध करीत  अतिक्रमकांनी नागपूर हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.  त्यामुळे सदरचे प्रकरण हे न्यायालयीन असल्याने सदर  प्रकरण विभागीय आयुक्तांकडे आहे, असे लोकांना सांगण्या त आले. त्याला न जुमानता गावातील शेकडो नागरिक  आणि ग्रामपंचायत प्रशासनाने बोरगाव मंजू ठाणेदार पी. के.  काटकर यांना पोलीस संरक्षण मागितले होते; पण सदरचे  प्रकरण हे न्यायालयीन असल्याने त्यात पोलिसांना बंदोबस्त  देता येत नाही, असे ठाणेदार काटकर यांनी समजावले,  त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि काही नागरिकांनी  १७  तारखेला अमरावती विभागीय आयुक्तांना भेटून या गायरान  जमिनीबाबत काही प्रकरण आपल्या स्तरावर प्रलंबित आहे  का, असे विचारले असता, विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडे  असे कोणतेच प्रकरण प्रलंबित नाही, असे लेखी पत्र ग्राम पंचायतीला दिले, त्यामुळे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र  देशमुख, पोलीस पाटील सुनील पायदाळे, सरपंच उषा गवई,  ग्रा.पं. सदस्य गजानन बाभुळकार आणि गावातील नागरिक  असे सर्व जण गावालगत असलेल्या गायरान शेतात  त्यांच्यासोबत जनावरे घेऊन गेले. तेव्हा तेथे दोन्ही गटात प्र थम शाब्दीक वाद होऊन नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत  झाले. या हाणामारीत अतिक्रमकांमधील श्रीकृष्ण तायडे,  गणेश तायडे, ज्योती सोळंके, गणेश सोळंके, दिलीप  सोळंके, मारोती गवई, वंदना गवई, प्रतिभा गवई, दुर्गा सावळे  हे नऊ नागरिक जखमी झाले, तसेच यावेळी दुसर्‍या गटात  असलेले गावातील काही नागरिक किरकोळ जखमी झाले.  यामुळे म्हैसांग गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले  आहे. दरम्यान, ठाणेदार पी. के. काटकर यांनी परिस्थिती  नियंत्रणात आणून जखमींना अकोला येथे उपचारार्थ भरती  केले असून, दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल आणि  अटक करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान,  म्हैसांग गावात आता शांतता असून, गावात पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे.