शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध, आमदार देशमुख, पोलिसांमध्ये बाचाबाची

By नितिन गव्हाळे | Updated: October 7, 2023 19:03 IST

महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी अकोल्यात आले होते.

अकोला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना जुने शहर पोलिसांनी स्थानबद्ध करून शिवसैनिकांना राजराजेश्वर मंदिरात रोखून धरले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे आमदार नितीन देशमुख व पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. शहरात अवैध धंदे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी, शिवसैनिकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात. अवैध धंदे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल का करीत नाही? असा संतप्त सवाल आमदार नितीन देशमुख यांनी केला.

महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी अकोल्यात आले होते. मनपातील मालमत्ता कराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी जाणार होते. त्यापूर्वी शिवसैनिक राजराजेश्वर मंदिरात गेले.

याठिकाणीच जुने शहर पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. याची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख यांनी तात्काळ राजराजेश्वर मंदिरात पोहोचले आणि शिवसैनिकांना का स्थानबद्ध केले? असा सवाल त्यांनी केला. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावर आमदार देशमुख यांनी संतप्त होत कोणत्या कलमांखाली गुन्हे दाखल करणार?, शहरात अवैध धंदे तुम्हाला दिसत नाहीत? आधी त्यांच्यावर कारवाई करा. असे प्रश्न केले. आमदार देशमुख व पोलिसांदरम्यान झालेल्या वादावादीमुळे तणाव निर्माण झाला होता.  

टॅग्स :Nitin Deshmukhनितीन देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना