अकोला: जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील करण सतीश शहाणे या १२ वर्षीय मुलाचा सार्वजनिक शौचालयाच्या टाक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी घडली. शौचालयाच्या दुरवस्थेकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी बुधवारी सकाळी मनपावर धाव घेतली.शिवसेना वसाहतमधील गुरुदेवनगरस्थित १२ वर्षीय करण शहाणे परिसरालगतच्या लोकमान्यनगरातील सार्वजनिक शौचालयाजवळ आला. या ठिकाणी तोल जाऊन तो शौचालयाच्या उघड्या टाक्यात पडला. त्याचा आवाज कुणाला ऐकू न आल्याने त्याला वाचविता आले नाही. या घटनेत करणचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी बुधवारी सकाळी जुने शहर पोलीस ठाण्यात शौचालयाचे बांधकाम करणार्या कंत्राटदाराविरोधात तक्रार नोंदवली. तसेच शौचालयाच्या दुरवस्थेकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी मनपावर धाव घेतली. यावेळी प्रशासनाच्यावतीने निवेदन स्वीकारण्यासाठी सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी महापौरांना निवेदन सादर केले.
नागरिकांची अकोला महापालिकेवर धडक
By admin | Updated: January 8, 2015 00:40 IST