शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यालगत आग

By admin | Updated: March 16, 2017 03:07 IST

अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळावर धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

अकोला, दि. १५- सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यालगत असलेल्या धाबेकर सभागृहासमोरील एका कचर्‍याच्या ढिगाला बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यालगतच्या तारेच्या कुंपणाजवळ एक वेडसर महिला अनेक वर्षांंंपासून राहते. या महिलेने अनेक वर्षांंंपासून विविध प्रकारचा कचरा, प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांसह काडीकचरा, कागद जमा करून ठेवले होते. या ठिकाणी मोठा ढीग साचला होता. बुधवारी सायंकाळी अचानक कचर्‍याने पेट घेतला. यावेळी कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ ही महिला झोपलेली होती; परंतु सिव्हिल लाइन पोलिसांनी प्रसंगावधान राखून महिलेला बाहेर काढले. तोपर्यंंंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. कचर्‍याने चांगलाच पेट घेतल्याने, रस्त्यावरून जाणारे वाहनचालक व नागरिकांनी मोठी गर्दी केली. वार्‍यामुळे तर कचर्‍याने आणखीच पेट घेतला. आगीच्या ज्वालांच्या झळा पोलीस ठाण्यापर्यंंंत येऊन पोहोचल्या. पोलीस कर्मचार्‍यांनीसुद्धा पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु रौद्ररूप धारण केलेली आग आटोक्यात येत नव्हती. हे लक्षात येताच पोलिसांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी पाण्याचे तीन बंब रिचवून आग नियंत्रणात आणली. आगीमुळे परिसरातील काही झाडे जळून खाक झाली.