शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाच्या ‘स्वच्छतादूत’ला नागरिकांची नकारघंटा

By admin | Updated: March 15, 2016 02:31 IST

नगरसेवकही पेचात; प्रशासनाने लागू केले दर.

अकोला: घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने ह्यस्वच्छतादूत आपल्या दारीह्ण ही अभिनव संकल्पना सुरू केली. स्वयंरोजगार तत्त्वावर नियुक्त केलेले सफाई कर्मचारी कचरा गोळा करण्याच्या बदल्यात नागरिकांजवळून प्रत्येकी १0 रुपये, ३0 रुपये आणि व्यावसायिकांकडून २00 रुपये मासिक शुल्क जमा करतील. काही प्रभागांमध्ये शुल्क वसुली सुरू असली तरी या प्रकाराला नागरिकांची नकारघंटा असल्यामुळे नगरसेवकांपुढे ह्यइकडे आड, तिकडे विहीरह्ण अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहरात साचणार्‍या कचर्‍यामुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिवाळीमध्येच कचरा गोळा करण्यासाठी ३६ अँपे वाहनांची खरेदी केली. प्रत्येक प्रभागात एक वाहन तैनात करण्यात आले. या वाहनांवर मनपाच्या आस्थापनेवरील कर्मचारी गुंतत असल्याचे पाहून यापूर्वी घंटागाडीद्वारे कचरा गोळा करणार्‍या खासगी वाहकांनाच अँपेवर स्वयंरोजगार तत्त्वावर नियुक्त करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. यामधील अनेकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येऊन, त्यांना परवानेसुद्धा काढून देण्यात आले. वाहनांची संख्या कमी पडत असल्याने पुन्हा नवीन ४५ वाहनांची खरेदी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. याप्रमाणे शहरात ८१ वाहनांद्वारे प्रभागनिहाय कचरा गोळा केला जाईल. ह्यस्वच्छतादूत आपल्या दारीह्ण या संकल्पनेनुसार घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याच्या बदल्यात नागरिकांजवळून मिळणार्‍या पैशांतून संबंधित चालकाच्या उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होईल, हा प्रशासनाचा उद्देश आहे. याशिवाय यामुळे मनपा आस्थापनेवरील कर्मचार्‍यांना इतर सेवांमध्ये नियुक्त करता येईल. याकरिता प्रशासनाने साधे मातीचे-टिनपत्र्याचे घर असल्यास संबंधित नागरिकाकडून दहा रुपये, पक्के स्लॅबच्या घराकरिता ३0 रुपये आणि हॉटेल व्यावसायिकांना मासिक २00 रुपये शुल्क देणे बंधनकारक केले. सद्यस्थितीत ही शुल्कवसुली सरसकट सर्वच प्रभागांमध्ये होत नसल्याने मनपाच्या ह्यस्वच्छतादूतह्णला पैसे देण्यावरून नागरिकांची नकारघंटा ऐकावयास मिळत आहे.