मूर्तिजापूर : स्थानिक पोळा चौकात १९ मेच्या रात्री काही लोक खासगी टँकर आणून तेथील नागरिकांना पाणी वाटप करीत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष भारत भगत यांचा दोन युवकांशी वाद झाल्याने त्या युवकांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या मूर्तिजापूर शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.त्यामुळे काही लोक स्थानिक पोळा चौकात गुरुवारी रात्री १0 वाजता खासगी टँकरद्वारे नागरिकांना पाणी वाटप करीत असताना त्यांचा व दोन युवकांचा पाणी वाटपावरून वाद झाला. सदर वादाच्या कारणावरून त्या दोन युवकांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे भारत भगत हे जखमी झाले. त्यांना लोकांनी उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात नेऊन दाखल केले आहे. दरम्यान हे वृत्त लिहीपर्यंंत या मारहाणीबद्दल मूर्तिजापूर पोलीस स्टेशनमध्ये कसलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
पाणी वाटपाच्या वादातून भाजप शहराध्यक्षास मारहाण
By admin | Updated: May 20, 2016 01:41 IST