शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वेगाने पसरताेय काेराेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:17 IST

अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे पाहून मनपा प्रशासन सैरभैर झाल्याचे दिसत आहे. रविवारी जिल्हा सामान्य ...

अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे पाहून मनपा प्रशासन सैरभैर झाल्याचे दिसत आहे. रविवारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून शहरातील तब्बल ३८४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल मनपाला प्राप्त झाला. दरम्यान, पूर्व व दक्षिण झाेनमध्ये नागरिकांच्या बेफिकीरीमुळे काेराेनाचा कहर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. संसर्गजन्य काेराेनामुळे नागरिकांचे मृत्यू हाेत असले तरीही अकाेलेकरांना या साथराेगाचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल तर जिल्हा प्रशासनाने काेराेना चाचणी बंधनकारक केली. त्यामुळे शहरातील व्यापारी, दुकानांमधील कामगारांनी चाचणीसाठी पुढाकार घेतला आहे. यादरम्यान काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. शहरात काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असून अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, यामुळे मनपा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.

पूर्व, दक्षिण झाेन अनियंत्रित

शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये वाढली आहे. आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहेत. रविवारीदेखील पूर्व झोन अंतर्गत १७१, पश्चिम झोन अंतर्गत ५८, उत्तर झोन अंतर्गत ३८ आणि दक्षिण झोन अंतर्गत ११७ असे एकूण ३८४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आलेले आहेत.

७८१ जणांनी केली चाचणी

काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाद्वारे शहरातील एकूण ७८१ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले.

मनपाचे पूर्व, दक्षिण झाेनकडे दुर्लक्ष

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाची लागण हाेणाऱ्या रुग्णसंख्येत माेठी वाढ झाल्याचे समाेर आले आहे. या दाेन्ही झाेनमधील नागरिकांचे बेजबाबदार वर्तन, काेराेनाबद्दल कमी झालेली धास्ती काेराेनाच्या प्रसारासाठी पाेषक ठरली आहे. मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी उपराेक्त दाेन्ही झाेनमध्ये ठाेस उपाययाेजनांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.