शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी हवे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 02:43 IST

अकोला महापालिकेचे अकोलेकरांना आवाहन.

अकोला, दि. १७- स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिका स्तरावर वैयक्तिक शौचालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी अकोलेकरांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी उघड्यावर शौच न करता शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. राज्य शासनाच्या ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्ण अभियानांतर्गत शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे महापालिकांना उद्दिष्ट आहे. घरी वैयक्तिक शौचालय नसणार्‍या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे काम मनपा स्तरावर सुरू आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाने शहरात सर्व्हे करून आजपर्यंत ११ हजार ५१५ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केल्याची माहिती आयुक्त अजय लहाने यांनी दिली. उर्वरित २00 शौचालयांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मनपाची हद्दवाढ झाल्यामुळे नवीन प्रभागातदेखील दोन हजार वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करून शहर हगणदरीमुक्त करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. त्यासाठी महापालिकांना ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ३१ मार्चनंतर १ मेपर्यंत शहराला हगणदरीमुक्त करण्याचे शासनाचे निर्देश असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यानंतर मात्र शासनाकडून विशेष योजनांचे अनुदान बंद केले जाईल. त्यामुळे अकोलेकरांनी आता शौचालयांचा वापर करण्याची नितांत गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी उपायुक्त समाधान सोळंके उपस्थित होते. सार्वजनिक शौचालयांमध्ये सुविधाशहरात ९६ ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहेत. त्या ठिकाणी १ हजार ७२८ सिटची व्यवस्था करण्यात आली असून, नवीन सात ठिकाणी शौचालयांचे बांधकाम केले जात आहे. ज्या ठिकाणी पाणी, वीज, स्वच्छता अशा सुविधा नव्हत्या, त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याची माहिती आयुक्त लहाने यांनी दिली.