शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरमध्ये धावणार ‘सिटी बस’!

By admin | Updated: September 29, 2016 01:52 IST

पहिल्या टप्प्यात अकोला शहरासाठी २0 बसेसचा ताफा नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात दाखल होणार.

अकोला, दि. २८- महापालिका प्रशासनाची शहर बस वाहतूक सुविधा अडीच वर्षांपूर्वी बंद पडल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. ही प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर असून, नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अकोलेकरांच्या सेवेत २0 शहर बससेचा ताफा दाखल होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात उर्वरित १५ सिटी बसेस रस्त्यावर धावतील.महापालिकेची सप्टेंबर २00१ मध्ये स्थापना झाल्यानंतर तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या काळात पहिल्यांदा सिटी बस सेवा सुरू करण्यात आली होती. कालांतराने बस वाहतूक सेवेला घरघर लागली. भारिप-बमसंच्या तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या कार्यकाळात १८ सिटी बसपैकी रस्त्यांवर केवळ सात बस धावत होत्या. भंगार अवस्थेतील या बसला अपघात झाल्यास त्याची जबाबदारी महापौरांसह महापालिका आयुक्तांवर निश्‍चित होणार असल्याने, २0१४ मध्ये सर्वसाधारण सभेत महापौर ज्योत्स्ना गवई व तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शहर बस वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून बस सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांची चांगलीच कुचंबणा होत आहे. बस सेवा बंद झाल्याचा फायदा घेत ऑटोचालकांनी भाडेवाढ केली, त्यामुळे मनपाची बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. शहरवासीयांची गरज ओळखून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी प्रशासनाच्या सोयीचा करारनामा तयार करून निविदा अर्ज बोलावले. यामध्ये श्रीकृपा ट्रॅव्हल्स नागपूरच्यावतीने सर्वाधिक २ रुपये ११ पैसे प्रतिकिलोमीटर दराची निविदा प्रशासनाने मंजूर केली. संबंधित कंपनीकडून मनपाला वार्षिक ४६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. संबंधित कंपनीकडून नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात २0 सिटी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असून, उर्वरित १५ बसेस डिसेंबरमध्ये शहरात दाखल होणार असल्याची माहिती आहे. हमी नाहीच!तत्कालीन भाजप-सेनेच्या कार्यकाळात शहर बस सेवा सुरू करणार्‍या संस्थेने खरेदी केलेल्या बसेसच्या कर्जासाठी बँकेत मनपाच्यावतीने हमी घेतली होती. कालांतराने त्या कर्जाचा भुर्दंड मनपा प्रशासनाला सहन करावा लागला. त्यामुळे नव्याने केलेल्या करारनाम्यात प्रशासनाने कोणत्याही प्रकारची हमी घेतली नाही, हे येथे उल्लेखनीय.ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना सुविधाशहर बसमध्ये प्रवास करताना शासनाच्या निकषानुसार नागरिकांना तिकिटांच्या दरात सुविधा मिळणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध किंवा दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त क्रीडापटू आदींचा समावेश राहील. ३0 आसनी प्रवासी क्षमताशहरात अकोलेकरांच्या सेवेमध्ये ३0 आसनी प्रवासी क्षमता असलेल्या तब्बल ३0 बसेस धावतील. उर्वरित पाच बसेस राखीव ठेवल्या जाणार आहेत. सिटी बसचा दर्जा उच्च प्रतीचा असावा, यासाठी प्रशासन आग्रही आहे. त्यामुळेच श्रीकृपा ट्रॅव्हल्स कंपनीसोबत केलेल्या करारात टाटा ७0९ ई एक्स वाहन खरेदीची अट नमूद आहे. परिणामी वाहन खरेदीच्या किमतीत वाढ झाली असून, कंपनीला प्रतिवाहन सुमारे १७ लाख रुपये मोजावे लागतील, असा अंदाज आहे. कंपनीसोबत १0 वर्षांचा करार राहील.