शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

वान प्रकल्पातून अकोला शहराला पाणी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:05 IST

अकोला शहराला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा मिळण्याची आशा धूसर झाली आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहराची तहान भागविण्यासाठी वान प्रकल्पात २४.०० दलघमी पाणी आरक्षित करण्याच्या मंजूर निर्णयास स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोला शहराला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा मिळण्याची आशा धूसर झाली आहे.अकोला महानगराला महानच्या काटेपूर्णा प्रकल्पातून नियमित पाणी पुरवठा होता. या प्रकल्पाचा कॅचमेंट एरिया वाशिम जिल्हा परिसर आहे. अकोला शहराची तहान वाशिम जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असते. साधारणपणे दर तिसऱ्या वर्षी अकोला शहरावर भीषण पाणी टंचाईची समस्या भेडसावते हा इतिहास आहे, त्यामुळे अकोला शहराची तहान कायमस्वरूपी भागविण्यासाठी वान प्रकल्पात २४.०० दलघमी पाणी आरक्षित ठेवण्याच्या निर्णयास २९ आॅगस्ट २०१९ रोजी मंजुरी देण्यात आली. भविष्यात महान काटेपूर्णा प्रकल्प आटल्यास अकोला शहराला वानमधून पाणी मिळणार होते. त्या दिशेने योजनाही आखली जात होती; मात्र अकोला सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता शिल्पा आळशी यांनी शासनाने हा निर्णय फिरविल्याचे स्पष्ट केले आहे. आरक्षण प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर एका महिन्याने म्हणजेच १० फेब्रुवारी २० च्या अधीक्षक अभियंतांच्या पत्राने हा निर्णय फिरविला आहे.

दरवर्षी होते पाण्याची नासाडी...अकोला, अमरावती आणि बुलडाणाच्या सीमेवर हनुमान सागर म्हणजेच वानचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे तेल्हारा, अकोट परिसरात हरितक्रांती झाली आहे. एका विशिष्ट क्षमतेनंतर या प्रकल्पातील पाणी सांडव्यातून वाहून जाते किंवा सोडावेच लागते. दरवर्षी ओव्हर फ्लोमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. अन् ते पाणी थेट तापीला जाऊन मिळते. पाण्याची नासाडी होण्यापेक्षा या प्रकल्पातील २४.०० दलघमी पाणी अकोला शहरासाठी आरक्षित का असू नये असा प्रश्न उपस्थित करून अकोल्यासाठी पाणी आरक्षण ठेवण्यात आले होते.

कॅट सचिवांनी पालकमंत्र्यांना दिले निवेदनअकोला शहरासाठी २४.०० दलघमी पाणी पुरवठ्याच्या आरक्षणास शासनाने स्थगिती देण्यामागचे कारण काय, हा निर्णय का आणि कुणाच्या हितासाठी घेण्यात आला, असा थेट प्रश्न राष्ट्रीय कॅटचे सचिव अशोककुमार डालमिया यांनी अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले आहे अशी माहिती डालमिया यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्पwater transportजलवाहतूक