शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सरोवर परिसरातील सीताफळांच्या झाडांची कत्तल

By admin | Updated: October 9, 2014 00:34 IST

लोणार सरोवर अभयारण्य घोषित झाले असले तरी वृक्षतोड सर्रास सुरू; रानमेवा मिळणे दुरापास्त.

लोणार : जगप्रसिद्ध लोणार सरोवर ज्याप्रमाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे लोणार सरोवरा तील रानमेवा समजले जाणारे सीताफळही गोडव्यासाठी प्रसिद्ध आहे. या सीताफळाला इतर प्रांतातही मागणी होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून सरोवरातील सीताफळाच्या झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे सीताफळाचा गोडवा हरवत आहे.लोणार सरोवराच्या जवळपास ५-६ किलोमीटरच्या परिघात लाखो सीताफळांची झाडे होती. या झाडांमुळे नागरिकही तलावात जाण्यासाठी धजावत नव्हते. ऐन सीताफळाच्या हंगामात दसरा ते दिवाळी या काळात सीताफळांची गोडी चाखण्यासाठी अबालवृद्ध सरोवर परिसरात जायचे. या सी ताफळाची गोडी प्रसिद्ध असल्याने येथील सीताफळ स्थानिक नातेवाईकही आपल्या लांबच्या संबंधि ताना पाठवित असत. यामुळे पुढे-पुढे सरोवरातील सीताफळाला पैसे देऊन मागणी वाढू लागली. कारण हे सीताफळ मोठय़ा आकारात रहायचे. वन विभागाने या सीताफळाच्या झाडांची हर्रासी सुरु केली होती. त्यातून वनविभागाला मोठय़ा प्रमाणात मोबदला मिळायचा. लोणार सरोवर अभयारण्य घोषित झाल्यापासून वनविभागाने सीताफळाच्या झाडांची हर्रासी थांबविली; मात्र वृक्षांची तोड वाढल्याने पूर्वी लाखोच्या संख्येत असलेली ही झाडे केवळ ४0 हजारापर्यंत येऊन ठेपली आहेत. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

*दरवर्षी ७0 टन सीताफळांचे उत्पादनसरोवर परिसरातील लाखो सीताफळाच्या झाडांपासून सुमारे ६0 ते ७0 टन सीताफळाचे उत्पादन दरवर्षी होत होते; परंतु मोठय़ा प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे सरोवरातील सीताफळाचे प्रमाण घटले आहे. मोठय़ा आकाराची सीताफळ खाण्यासाठी चविष्ट असल्यामुळे सरोवरातील सीताफळांची मोठी मागणी मुंबई, नाशिक, बुलडाणा, पुणे, जळगाव, वाशिम, अमरावती, अकोला या भागातून होते.