शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नागरिकांनो, कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 10:56 IST

दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावरही दिसू लागला आहे. अनेकांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे दिसू लागली आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.कोरोनाविषयी अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी बहुतांश लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना सर्दी, खोकला आणि तापीचे लक्षणे दिसून येतात; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा श्वास घेण्यास त्रास सुरू होतो, तेव्हा रुग्ण डॉक्टरकडे जातो. तोपर्यंत कोरोनाचा हल्ला फुप्फुसांवर झालेला असतो. रुग्णाचा अहवाल येईपर्यंत त्याच्या फुप्फुसाचे लोब खराब झालेले असतात. येथूनच ‘आॅर्गन फेल्युअर’ची सुरुवात होते. हा धोका टाळण्यासाठी सर्दी, खोकला जाणवताच रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा. गरज असल्यास कोरोनाची तपासणी करावी, असे आवाहनदेखील तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.९० टक्के रुग्ण घेतात उशिरा उपचाररुग्णालयात दाखल होणारे ९० टक्के रुग्ण हे सर्दी, खोकला येऊन गेल्यावर जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा रुग्णालयात दाखल होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.रुग्ण दाखल होतो, तोपर्यंत कोरोनाची लागण होऊन जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटलेला असतो, असे डॉक्टरांचे मत आहे.

खासगी दवाखान्यात प्रत्येक रुग्णाची नोंदजिल्ह्यातील प्रत्येक लहान-मोठ्या दवाखान्यात जाणाºया रुग्णांची नोंद होत आहे. संबंधित रुग्णाचा पत्ता तसेच त्याचा संपर्क क्रमांकदेखील घेण्यात येत आहे. या पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे.

अनेक रुग्ण उशिरा उपचारास सुरुवात करतात. तोपर्यंत त्यांच्या श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम झालेला असतो. कोरोनामुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी रुग्णांनी कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या