शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

नागरिकांसाठी अधिकारी व पदाधिका-यांना द्यावा लागेल वेळ!

By admin | Updated: February 4, 2016 01:31 IST

सामान्य प्रशासन विभागाचे आदेश; शहरी व ग्रामीण स्थानिक संस्थांमध्ये अंमलबजावणी.

नीलेश शहाकार/बुलडाणा : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषदांमधील अधिकारी व पदाधिकार्‍यांना भेटण्यासाठी येणार्‍या नागरिकांना निश्‍चित वेळ देऊन त्यांना पासेस द्याव्या लागणार आहेत. यासाठी कार्यालयात त्याची लेखी नोंदही घेतली जाईल. सामान्य प्रशासन विभागाकडून २ फेब्रुवारी रोजी संबंधित कार्यालयांना या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरापासून ते महापालिका क्षेत्रामध्ये येणार्‍या नागरिकांना विविध कामांसाठी कार्यालयाशी तसेच संबंधित अधिकार्‍यांशी दररोज संबंध येतो, त्यामुळे कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होते; परंतु अनेकदा अधिकारी व पदाधिकार्‍यांना कामाच्या व्यस्ततेमुळे नागरिकांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. परिणामी, कामांसाठी आलेल्या नागरिकांचा यामुळे वेळ वाया जातो. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी यापूर्वी २७ मे २0१३ च्या परिपत्रानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांनी जनतेच्या भेटीसाठी दुपारी २.३0 ते ३.३0 हा वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवावा, अशा सूचना करण्यात आल्या होत्या; परंतु ज्यावेळी नागरिक संबंधित अधिकार्‍यांकडे भेटीसाठी येतात, त्यावेळी संबंधित अधिकारी जागेवर उपलब्ध नसतात, अशा तक्रारी वाढत असल्याने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २ फेब्रुवारी रोजी नव्याने सूचना दिल्या आहेत.पासेस मिळणार !जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषदेमधील अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत सूचना मध्यवर्ती फलकावर रोज लावण्यात येईल. शिवाय कामांसाठी येणार्‍या प्रत्येक नागरिकाची नावासह रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाईल, तसेच अधिकार्‍यांनी विशिष्ट कामासाठी दिलेली वेळ निश्‍चित करून त्यांच्या नोंदणी पासेस नागरिकांना मिळतील.