आकोट (जि. अकोला) : मतदार यादीत घोळ झाल्याच्या आरोप करीत आकोट तालुक्यातील आकोली जहागिर येथील नागरिकांनी तहसीलदारांच्या निवासस्थानाला सोमवारी रात्रभर घेराव घातला. आकोली जहागिर येथील ग्रामपंचायत वॉर्ड क्र. ५ च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, वॉर्ड क्र. ५ साठी प्रसिद्ध झालेली मतदार यादी २0१२ च्या निवडणूक मतदार यादीला अनुसरून नाही. त्यातील १५१ नावे वगळण्यात आली आहेत, तर वॉर्ड क्र १, ३, ४ मधील २१८ मतदार चुकीने समाविष्ट झाले असल्याची तक्रार माजी सरपंच तथा शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे यांनी निवडणूक विभागाला ३0 मार्च रोजी सादर केली होती. सदर यादीतील मतदारांची नोंद चुकीने झाल्याचे सांगण्यात आले. यादी २0१२ च्या निवडणुकीप्रमाणे व जे रहिवासी वॉर्ड क्र. ५ मध्येच राहतात, त्यांचेच नाव समाविष्ट राहील, असे स्पष्ट करण्यात आले होते; मात्र ६ एप्रिल रोजी निवडणूक विभागाने यादीमध्ये बदल न करता तीच कायम ठेवल्याने बहाळे सर्मथकांनी सोमवारी रात्रभर तहसीलदार निवासासमोर निदर्शने करून घेराव केला. ७ एप्रिलला सकाळी पोलीस संरक्षणात उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याशी मतदार यादीच्या घोळाविषयी चर्चा केली.
अकोट तहसीलदाराच्या निवासस्थानाला घेराव
By admin | Updated: April 8, 2015 01:45 IST