शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चुरड्याने मिरचीला मरगळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 02:17 IST

विदर्भात दोन हजार कोटींवर नुकसान; आता अकोला जिल्ह्यात लागण.

राजरत्न सिरसाट/अकोला देशांतर्गत उत्पादनात मोलाचा वाटा असलेल्या राज्यातील मिरची पिकावर आलेल्या चुरडा-मुरडा (लीफ कर्ल व्हायरस) रोगाने मिरचीचे यावर्षी सर्वाधिक नुकसान केले. त्यातच बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले गेल्याने विदर्भात नुकसानाचा आकडा दोन हजार कोटींवर गेला आहे. मिरचीचा पिच्छा न सोडणार्‍या चुरड्याने आता पश्‍चिम विदर्भात आक्रमण केले आहे. अकोला जिल्ह्यात मिरचीवर या रोगाची लागण झाल्याने अगोदरच खरीप, रब्बी पिके हातची गेल्याने गलितगात्र झालेला शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रस शोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव वाढला होता. ही रस शोषण करणारी कीड स्थलांतर करीत असल्याने मिरचीवर आलेल्या या किडीने चुरडा रोगाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला. चुरडा-मुरडा रोगाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने या रोगाने यावर्षी विदर्भात ७0 ते ८0 टक्के मिरचीचे नुकसान झाले आहे. मिरची हे परागीकरण होणारे पीक असून, दरवर्षी नवीन बियाणे मिळवावे लागत असल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी भिवापुरी, मलकापुरी व इलिचपुरी या पारंपरिक मिरचीसोबतच संकरित मिरचीचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे. संकरित मिरचीचे उत्पादन एकरी दीडशे क्विंटलच्या वर असल्याने विदर्भात संकरित मिरचीची लागवड अलीकडे वाढली आहे.राज्यातील मिरचीचे क्षेत्र जवळपास १ लाख २५ हजार हेक्टरवर आहे. यातील सर्वाधिक ७५ हजार हेक्टर क्षेत्र हे विदर्भात आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात ५५ हजार, तर अमरावती विभागात २0 हजार हेक्टरच्या जवळपास हे क्षेत्र आहे. त्यानंतर नंदुरबार, कोल्हापूर, धुळे, जळगाव खान्देश, मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात मिरची पीक घेतले जाते.२ दरम्यान,शेतकर्‍यांना गेल्या वर्षीच्या कमी पावसाचा फटका तर बसलाच, शिवाय या पिकाला रोगाने ग्रासल्याने यावर्षी संकरित मिरचीपासून मिळणार्‍या एकरी दीडशे ते दोनशे क्विंटल मिळणार्‍या उत्पादनात ७0 ते ८0 टक्के घट झाली आहे. सरळ वाणापासून एकरी उत्पादन शंभर क्विंटलच्या जवळपास होते; तेही घटले आहे. आता चुरड्याचा प्रसार पश्‍चिम विदर्भात होत असून, अकोला जिल्ह्यातील दानापूर व इतर भागांमध्ये या रोगाने हातपाय पसरल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.काय आहे चुरडा? चुरडा झाडाचे रस शोषण करीत असल्याने मिरचीची पाने चुरड्यासारखी होतात. झाडाची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. परिणामी, मिरचीवर निर्माण करणारा फुलोरा गळून पडतो. त्यामुळे उत्पादनात तीव्र स्वरू पाची घट येते.