शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

चित्रकला स्पर्धेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: June 6, 2016 02:41 IST

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘लोकमत’चा उपक्रम.

अकोला: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवार, ५ जून रोजी सकाळी ८ वाजता नेहरू पार्कमध्ये चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. 'लोकमत'च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शेकडो शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी दिलीप तायडे, माहिती अधिकारी गोविंद पांडे, लोकमत अकोला आवृत्तीचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, लोकमत समाचारचे अरुणकुमार सिन्हा, एचआर प्रमुख रवींद्र येवतकर, कला शिक्षक श्रीकांत चौथे व नेहरू पार्कचे संचालक बी.एस. देशमुख हे उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते श्रद्धेय बाबूजी उपाख्य जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी व्यासपीठावर ठेवलेल्या फलकावर गणपती बाप्पांचे चित्र साकारून चित्रकला स्पर्धेचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले. प्रास्ताविक लोकमत समाचारचे अरुणकुमार सिन्हा यांनी केले. सामाजिक वनीकरण विभागाचे माहिती अधिकारी गोविंद पांडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण का व केव्हापासून साजरा करण्यास सुरूवात झाली यासंदर्भात विशेष माहिती दिली. उद्घाटन कार्यक्रमानंतर लोकमतच्यावतीने विद्यार्थ्यांना ड्रॉइंग शीट वितरित करण्यात आल्या.