शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाने केली सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 13:58 IST

मारूती व्हॅनमधून आलेल्या व तोंडाला कापड बांधलेल्या तिघा जणांनी मंदारच्या तोंडावर रूमाल झटकून त्याला बेशुद्ध केले आणि त्याला व्हॅनमध्ये डांबून अकोल्यात आणले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट शहरातील यात्रा चौकातून अपहरण करण्यात आलेल्या १३ वर्षीय मुलाने अपहरणकर्त्या तिघांच्या तावडीतून सुटका करीत, थेट पोलीस कर्मचाऱ्याला गाठले आणि आपबिती कथन केली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी नोंद घेतली.अकोट शहरातील यात्रा चौकात राहणारा मंदार दीपक गोरे (१३) याला त्याच्या आईने सोमवारी दुपारी औषध आणण्यासाठी मेडिकल दुकानावर पाठविले; परंतु चौकातील दुकान बंद असल्याने, तो घरी जाण्यासाठी वळला. मारूती व्हॅनमधून आलेल्या व तोंडाला कापड बांधलेल्या तिघा जणांनी मंदारच्या तोंडावर रूमाल झटकून त्याला बेशुद्ध केले आणि त्याला व्हॅनमध्ये डांबून अकोल्यात आणले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास अपहरणकर्ते मंदार गोरे याला घेऊन रेल्वे स्टेशनवर आले. व्हॅनमधून काढून त्याला रेल्वे स्टेशनच्या फलाटावर नेण्यासाठी त्यांनी मंदारच्या तोंडावर पाणी शिंपडले. त्यामुळे तो जागा झाला. त्याला जवळच एक पोलीस कर्मचारी उभा असल्याचे दिसून आले. त्याने चाणाक्षपणे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून निसटून थेट पोलीस कर्मचाºयाला गाठले नव्हे तर तो चक्क त्या पोलीस कर्मचाºयाला बिलगला. नंतर त्याने पोलीस कर्मचाºयाला आपबिती कथन केली. पोलिसांनी लगेच अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते पसार झाले होते. पोलीस कर्मचाºयाने मंदारला पोलीस ठाण्यात आणून, त्याच्या वडिलांसोबत संपर्क साधला. वडील दीपक गोरे अकोल्यात आल्यावर, त्यांच्या ताब्यात मंदारला देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. मंदार अद्यापही काही बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याचे त्याच्या वडिलांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या कामी पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनीसुद्धा सहकार्य केले. (प्रतिनिधी)अकोट व रेल्वे पोलिसांचा तपासयात्रा चौकातून मंदारचे अपहरण केल्यानंतर अकोट शहर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अकोट पोलीस अपहरणकर्ते व मारूती व्हॅनचा तपास घेण्यासाठी सीसी कॅमरे तपासून पाहात आहेत. तसेच रेल्वे पोलीससुद्धा तपास करीत आहेत.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाKidnappingअपहरण