शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री करणार २५0 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण!

By admin | Updated: February 1, 2016 02:29 IST

११ फेब्रुवारीला जिल्हा दौर्‍यावर; पालकमंत्र्यांनी दिली माहिती.

अकोला : जिल्हा नियोजन भवन, पंचायत समितीची इमारत, रस्ते, पोलीस ठाण्याच्या इमारती आदींसह २५0 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याशिवाय आणखीही काही प्रस्तावित कामांची घोषणा या दौर्‍यात मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची माहिती दिली. सकाळी ११ वाजता त्यांचे अकोला येथे आगमन होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समारंभात ते विविध कामांचे भूमिपूजन करणार असून, शासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळाही त्यांच्या हस्ते होईल. दुपारी २.३0 वाजेपर्यंत ते अकोला येथे आयोजित विविध कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळय़ात सहभागी होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातच आयोजित केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे आदींची उपस्थिती होती.