शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

७ ऑक्टोबरला मुख्यमंत्री अकोल्यात?

By admin | Updated: September 27, 2016 03:39 IST

जिल्हाधिका-यांनी घेतली अधिका-यांची बैठक.

अकोला, दि. २६- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ ऑक्टोबर रोजी अकोला दौर्‍यावर येण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अकोल्यातील संभाव्य दौरा कार्यक्रमासंबंधी नियोजनाची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी अधिकार्‍यांची बैठक घेतली. अकोल्यातील १५0 कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन आणि इतर विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौर्‍यावर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम अद्याप निश्‍चित नसला तरी, मुख्यमंत्री अकोला दौर्‍यावर येणार असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. त्यानुसार संभाव्य अकोला दौर्‍यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करावयाच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व इतर कार्यक्रमांसंबंधी माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी विविध विभागाच्या अधिकार्‍यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्ते, मनपा आयुक्त अजय लहाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते. अकोल्यातील नियोजित कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा संभाव्य अकोला दौरा निश्‍चित होण्याची शक्यता आहे.