शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कपसाठी गावांमध्ये चुरस

By admin | Updated: May 4, 2017 00:48 IST

अकोला : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हयातील अकोट , बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असून नागरिक मोठ्या संख्येने श्रमदान करीत आहेत.

गावोगावात नागरिक करताहेत स्वयंस्फूर्तीने श्रमदान अकोला : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हयातील अकोट , बार्शीटाकळी व पातूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे सुरू असून त्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने श्रमदान करीत आहेत.स्पर्धेत नसतानाही हिंगणा गावात झाले श्रमदानशिर्ला : पातूर तालुक्यामध्ये सध्या वॉटर कप स्पर्धेनिमित्ताने अनेक गावात श्रमदानातून जलसंधारणाची कामे जोरात सुरू आहेत. या स्पर्धेत तालुक्यामधील ३५ गावे सहभागी झालेली आहेत; पण या स्पर्धेत सहभागी झाले नसलेल्या हिंगणा गावातील नागरिकांनी देखील जलसंधारणाची कामे करण्यासाठी पुढाकार घेऊन २ मे रोजी श्रमदानास प्रारंभ केला.हिंगणा गावाची निवड या स्पर्धेसाठी झाली होती; परंतु त्यानंतर गावातील कुणीही वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी गेले नव्हते. त्यामुळे हे गाव स्पर्धेमधून बाद झाले होते; परंतु गावातील काही युवक सातत्याने पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक कोल्हे, नानवटे व शिर्ला येथे वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदान करणाऱ्या टीमच्या संपर्कात होतेच. त्यांनी शिर्ला, चारमोळी, गोंधळवाडी या गावात होत असलेल्या श्रमदानाच्या कार्यापासून प्रेरणा घेत हिंगणा गावातील शाळकरी मुलांसह युवकांनी दुष्काळावर मात करण्याचे ठरवून २ मेपासून हिंगणावासीयांनी जलसंधारणासाठी श्रमदानाच्या कार्यास प्रारंभ केला. पहिल्याच दिवशी गावाजवळच्या गायरानात वृक्ष लागवडीसाठी खड्डे, मोठमोठ्या झाडांसाठी खोल आळे खोदत सकाळी ६.१५ वाजतापासून ते ९ वाजेपर्यंत अंदाजे दीड ते दोन लाख लीटर्स पाणीसाठा होईल, एवढे काम केवळ १० ते १२ जणांनी पूर्ण केले. जलसंधारणासाठी बालकही सरसावलेपातूर : पातूर तालुक्यातील अंधार सांगवी येथे २८ एप्रिल रोजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी जलसंधारणाच्या कामात सहभाग घेऊन श्रमदान केले. बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनीही श्रमदान केले. यावेळी गावातील नागरिक, महिला, तरुणसुद्धा श्रमदानात सहभागी झाले होते. पातूर तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत तालुक्यातील शिर्ला, गोंधळवाडी, चारमोळी, अंधार सांगवी यासह स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावातील गावकरी जिद्द, चिकाटी व कष्टाने जलसंधारणाची कामे करीत आहेत. त्यामध्ये पुरुष, महिला, तरुणासह लहान-लहान मुलेसुद्धा सहभागी होत आहेत. तालुक्यातील जांभरूण गावात चिमुकल्या जलसैनिकांनी त्यांच्या नावाचे दगडी बांध बांधले आहेत. या बालकांचे काम कौतुकास्पद असून, इतरांना प्रेरणा देणारे आहे. ग्रामसेवकाने खोदले ५०१ खड्डेशिर्ला : शिर्लाच्या दुष्काळमुक्तीसाठी महिन्याचा पूर्ण पगार देणारे राहुल उंदरे यांनी एकट्याच्या श्रमदानातून वृक्षारोपणासाठी ५०१ खड्डे पूर्ण करण्याचा प्रेरणादायी विक्रम केला आहे.राज्यातील ३० तालुक्यांतील वॉटर कप स्पर्धेतील आगळा वेगळा विक्रम ग्रामसेवक राहुल उंदरे यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. राहुल उंदरे शिर्ला ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहेत. दररोज सकाळी गावकऱ्यांसोबत श्रमदान करतात. सायंकाळी संकल्प केलेले खड्डे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त श्रम करतात. एरव्ही ग्रामसेवक मुख्यालयाच्या गावी शोधून सापडत नाहीत. मात्र, राहुल उंदरे श्रमदानाबरोबरच लोकांची शासकीय कामे मोहीम स्थळी करतात. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले होते.