शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारात विषमता दूर करण्याचे सार्मथ्य - छत्रपती संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:49 IST

अकोला : स्वराज्यच नव्हे, तर सुराज्य निर्मितीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भर होता. म्हणून छत्रपतींवर देशभरातील जनतेचे प्रेम आहे. केवळ मराठय़ांना घेऊन छत्रपती एकत्र आले नाही, अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतेदारांना घेऊन ते पुढे आले. समाजातील विषमता दूर करायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांसह, फुले-शाहू-आंबेडकर समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केले. त्यांचे हस्ते  गोरक्षण मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याच्या स्थानांतरण सोहळा थाटात पार पडला यावेळी ते बोलत होते. 

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याचे थाटात स्थानांतरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वराज्यच नव्हे, तर सुराज्य निर्मितीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भर होता. म्हणून छत्रपतींवर देशभरातील जनतेचे प्रेम आहे. केवळ मराठय़ांना घेऊन छत्रपती एकत्र आले नाही, अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतेदारांना घेऊन ते पुढे आले. समाजातील विषमता दूर करायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांसह, फुले-शाहू-आंबेडकर समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केले. त्यांचे हस्ते  गोरक्षण मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याच्या स्थानांतरण सोहळा थाटात पार पडला यावेळी ते बोलत होते. खा. संभाजी राजे म्हणाले की  कोरेगाव-भीमासारख्या घटनांमुळे होणार्‍या राज्यातील दंगली निंदनीय आहेत. केवळ जयजयकार करण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आपण महान थोर-पुरुषांचे विचार समाजापर्यंत खरेच पोहोचवित आहोत का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचा केवळ जयजयकार न करता त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अनेकांना नाही,ती  माहिती नवीन पिढीला मिळेल, यासाठी पुढाकार घ्या, फुले-शाहू-आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराजांच्या विचारांचे एक रिसर्च सेंटर उघडा, यासाठी मी माझ्या खासदार निधीतून  देईन, अशी घोषणाही त्यांनी केली. रायगड प्राधिकरणासाठी ६0६ कोटी रुपयांचा निधी आला असून, प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५0 गड-किल्ल्यांपैकी पाच मॉडेल कि ल्ल्यांचे काम हाती घेतले आहेत. ते लवकरच सुरू होईल.अशी माहिती त्यांनी दिली.गुरुवारी सकाळी ११.३0 वाजता सुरू झालेल्या या स्थानांतरण सोहळ्याला शिवशाहीचे रूप आले होते. संकल्पच्या पारंपरिक ढोल-ताशांनी राजेंचे स्वागत करण्यात आले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहकार नगर शिवस्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांनी ताम्रपत्र देऊन राजेंचे आगळ-वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. प्रास्ताविक पंकज जायले यांनी केले. राजेंच्या हस्ते स्मारक समितीमधील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. सुधाकर खुमकर यांनी, तर आभार रुमाले गुरुजी यांनी मानले. कार्यक्रमाला शरद कोकाटे, तुषार जायले, विनायक पवार, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. सीमा तायडे, मार्तंडराव माळी, पंकज साबळे, प्रदीप गुरुखुद्दे, राजेंद्र पातोडे, प्रा. मधू जाधव, गजानन देशमुख, किनगे, मंगेश काळे, सुरेंद्र विसपुते, राम गव्हाणकर, मंगेश कक्कड, रवीभाऊ वैराळे, खाडे, राजू राठोड, किरण चौरे, ठाणेदार संतोष महल्ले, योगेश गुलाई, बी.एस. देशमुख, चंद्रशेखर शेळके, नितीन दांदळे, अमित ठाकरे, गोपी चाकर, विजय साबळे, पुरुषोत्तम आवारे, मयूर विखे, मनोज आखरे, सुभाष बनकर यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.सहकार नगरचा स्थानांतरण सोहळा नियोजित असताना स्थानांतरणाच्या ठिकाणाजवळ राहणारे  नामदेव दांदळे या सामाजिक कार्यकर्त्याचे बुधवारी रात्री निधन झाले; मात्र स्थानांतरण सोहळा रद्द न करण्याचे याच परिवाराने सांगितले. दांदळे परिवाराच्या या निर्णयाचे खासदार राजे संभाजी यांनी कौतुक केले आणि त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज