शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बंधा-यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 02:29 IST

७0 पेक्षाही अधिक बंधा-यांची सद्यस्थिती पाहणार.

अकोला, दि. २0- जिल्हय़ातील शेकडो कोल्हापुरी बंधार्‍यांची सद्यस्थिती तपासून त्याचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यासाठी चौकशी समितीचा दौरा मंगळवारपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे, ही समिती स्थापन करण्यालाही आता चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ह्यलोकमतह्णने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर समितीकडून ही तपासणी होत आहे.गेल्या काही वर्षात १00 हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांच्याकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित कामे हस्तांतरित करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठपुरावा केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याबाबत ह्यलोकमतह्णने वृत्त लावून धरले. ८ नोव्हेंबर २0१६ रोजी स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत गंभीर चर्चा झाली. सभेतच मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी तीन सदस्यांची समिती बंधार्‍यांची सद्यस्थिती तपासण्यासाठी गठित केली. त्या बंधार्‍यांची तपासणी करण्यासाठी चार महिन्यांपर्यंंंत स्थानिक स्तरकडून माहितीच मिळाली नाही. त्यानंतर जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ७२ बंधार्‍यांची जुजबी माहिती देण्यात आली. समितीचे सदस्य गोपाल कोल्हे यांनी बंधार्‍याचे सुरुवातीचे अंदाजपत्रक, त्यामध्ये झालेली वाढ, वाढीव निधीतून केलेले काम, त्यातून किती सिंचन वाढले, शेतकर्‍यांना कोणता लाभ झाला, या मुद्यांची माहिती मागवली. त्यावेळी १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान दौराही ठरवण्यात आला होता. त्यानंतर आता हा दौरा होत आहे. या तीन दिवसांच्या दौर्‍यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. देशमुख, स्थानिक स्तरच्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे. समितीच्या तपासणीनंतर हस्तांतरित होणार्‍या बंधार्‍यांचा अहवाल सादर केला जाणार आहे.