अकोला: महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामासह विविध विकास कामांची तपासणी करूनच देयक अदा करण्याचा निर्णय आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. ही जबाबदारी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, रस्त्यांच्या तपासणीला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरुस्तीसह नाल्या बांधणे, धापा तयार करणे, समाज मंदिराची उभारणी क रण्याची कामे सातत्याने केली जातात. यासाठी प्रशासनाला नागरी दलित वस्ती सुधार योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर योजना, मूलभूत सुविधांसह रस्ते अनुदानापोटी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होतो. या निधीतून होणारी कामे दज्रेदार असणे अपेक्षित आहे. याठिकाणी नेमके उलटे चित्र दिसून येते. अवघा महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच पुन्हा खड्डे तयार होतात. मनपाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची देयके अदा केल्यानंतरही कामाचा दर्जा अतिशय सुमार राहत असल्याची परिस्थिती आहे. सहा महिन्यांच्या काळात बांधकाम, जलप्रदाय विभाग, आरोग्य विभागातून सुमारे ९ कोटी रुपयांची थकीत देयके आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या काळात अदा करण्यात आली होती. देयकांच्या फाइलवर आयुक्तांची मंजूरी मिळवण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी अथक परिश्रम घेतल्याचे सर्वश्रुत आहे. या सर्व प्रकाराला चाप लावत आयुक्त लहाने यांनी सन २0१४ ते सप्टेंबर २0१५ पर्यंत करण्यात आलेल्या विकास कामांची देयके अदा न करता त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
रस्त्यांचा दर्जा तपासणार!
By admin | Updated: November 24, 2015 01:53 IST