शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: October 14, 2015 00:32 IST

शेगाव येथील घटना; तीन आरोपींना अटक.

शेगाव(जि. बुलडाणा): : पोलिस दलात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून २ लाख रुपये घेणार्‍या तिघांना शेगाव शहर पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी पैसे घेताना पकडले तसेच फिर्यादीवरुन या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. शेगाव येथील सुदामा नगरात राहणारे मोतीराम तायडे यांना पोलिस दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्यांना ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच मोतीराम तायडे यांच्याकडून १ लाख रुपये नोकरी लावण्यासाठी घेतले होते व उर्वरित २ लाख रुपये १२ ऑक्टोबर रोजी शेगाव येथील आनंद सागर समोर आणून द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने मोतीराम तायडे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे शेगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर, पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे, पोहेकाँ आनंदा वाघमारे, गजानन धोंडगे, नापोकाँ महादेव इंगळे, मपोकाँ भावना पोते यांच्या पथकाने १२ ऑक्टोबर रोजी सापळा रचून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे शे.जमाल शे.गुलाम (वय ५५) रा.कान्हेरी गवळी ता.बाळापूर, श्रीमती निता नाटेकर (वय ३२) रा.सुंदरखेड बुलडाणा, मंगल बद्रीनाथ थोरात (वय २४) रा.चांडक ले-आऊट बुलडाणा यांना पकडले. या प्रकरणी मोतीराम तायडे यांच्या फिर्यादीवरुन शेगाव शहर पोलिसांनी उपरोक्त तीन आरोपींविरुध्द कलम ४२0, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास शेगाव शहर पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.