शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दागिने चमकवून देण्याच्या नावाखाली फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 02:27 IST

डाबकी रोडवरील घटना; दोघा जणांनी केले दागिने लंपास.

अकोला, दि. ३- सोन्या-चांदीचे दागिने चमकवून व साफ करून देण्याच्या नावाखाली दोघा भामट्यांनी महिलेचे दागिने पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल केला. डाबकी रोडवरील गजानन नगरातील गल्ली क्रमांक ५ मध्ये राहणार्‍या जयश्री दशरथ मोगरे (५0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी दोन भामटे आले. त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चमकवून देण्याचे काम करतो. तुमच्याकडे काही सोन्या-चांदीचे दागिने असतील तर आम्ही ते चमकवून देतो, असे सांगितले. त्यामुळे जयश्री मोगरे व त्यांच्या मुलीने दोन भामट्यांना कानातील टॉप्स आणि सोन्याची साखळी चमकविण्यासाठी दिली आणि त्या दोघीही तेथेच बसल्या. भामट्यांनी दागिने चमकविण्याचा बनाव केला आणि हातचलाखीने सोन्याचे दागिने काढून घेतले आणि एका कापडामध्ये त्यांना दागिने बांधून दिले. या दोघी मायलेकींना घरात जाऊन दागिने उघडून पाहिले असता, त्यात काहीच दिसून आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत दोन्ही भामटे पसार झाले होते. अखेर जयश्री मोगरे यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार १0 ग्रॅमचे सोन्याचे दागिने भामट्यांनी लंपास केले. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध भादंवि कलम ४२0(३४) नुसार गुन्हा दाखल केला.