शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीच्या दरातील तूर डाळीची उचल रेंगाळली!

By admin | Updated: September 2, 2016 00:53 IST

अमरावती विभागात केवळ १८ टक्के डाळीची उचल करण्यात आली.

संतोष येलकरअकोला, दि. १: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी ऑगस्ट महिन्याकरिता अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी ११ हजार ६९९ क्विंटल तूर डाळ उपलब्ध झाली. उपलब्ध तूर डाळीच्या साठय़ातून १ सप्टेंबरपर्यंत केवळ २ हजार १२६ क्विंटल ४0 किलो (१८.१८ टक्के ) तूर डाळीची रास्त भाव दुकानदारांनी उचल केली. त्यामुळे अमरावती विभागात सवलतीच्या दरातील तूर डाळीची उचल रेंगाळली आहे.तूर डाळीच्या भाववाढीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील दारिद्रय़ रेषेखालील (बीपीएल) व अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात तूर डाळ वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. शासनाच्या ६ ऑगस्ट रोजीच्या परिपत्रकानुसार १0३ रुपये प्रती किलो दराने शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ वितरित करण्यासाठी शासनामार्फत जिल्हानिहाय तूर डाळीचा साठा मंजूर करण्यात आला. त्यानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यासाठी गत पंधरा दिवसांपूर्वी ११ हजार ६९९ क्विंटल तूर डाळीचा साठा विभागातील शासकीय धान्य गोदामात उपलब्ध झाला. दरम्यान, सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत सवलतीच्या दरातील तूर डाळ उपलब्ध होताच बाजारातील तूर डाळीचे दर घसरले. सवलतीच्या दरातील तूर डाळ १0३ रुपये प्रती किलो दराने वितरित करण्यात येत असताना, तीच डाळ बाजारात ६२ ते ७५ रुपये प्रती किलो दराने मिळत आहे. दरातील तफावतीमुळे शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरातील तूर डाळ परवडणारी नसल्याने, रास्त भाव दुकानदारांनी सवलतीच्या दरातील तूर डाळीची उचल करण्यास नकार दिला. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सवलतीच्या दरातील ११ हजार ६९९ क्विंटल तूर डाळीचा साठा शासकीय धान्य गोदामांमध्ये उपलब्ध झाला असला तरी, उपलब्ध साठय़ातून १ सप्टेंबरपर्यंत पाचही जिल्ह्यात केवळ २ हजार १२६ क्विंटल ४0 किलो तूर डाळीची उचल करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती विभागात सवलतीच्या दरातील तूर डाळीची उचल रेंगाळल्याची स्थिती आहे.उपलब्ध साठा उचल करण्यात आलेली तूर डाळ!जिल्हा             उपलब्ध साठा            केलेली उचलअकोला              २0३९                         ५९७अमरावती           २९४१                          ४0.३२बुलडाणा              २१३९                        ६९८वाशिम                १९२१                        ५0९यवतमाळ            २६५९                        २८२.0८ ......................................................................एकूण                ११६९९                          २१२६.४0