शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चारमोळी गावकर्‍यांचे काम प्रेरणादायी!

By admin | Updated: May 7, 2017 19:34 IST

चारमोळी या १२५ घर आणि साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या गावाने पाणी फाउंडेशन कपमध्ये सहभाग नोंदविला आहे.

पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप: जलसंधारण कामांची केली पाहणी

अकोला : तीन डोंगर पाषाण फोडून पाण्याचे चर, मातीचे ढाळ, पाणी मुरविण्यासाठी दगडी गोट्यांचे असे शेकडो बांध बांधून वॉटर कपसाठी फक्त तीन हजार घनमीटर पाणी अडवायचे लक्ष्य असताना, चारमोळी या गावाने श्रमदानातून चक्क त्याच्या दुप्पट सहा हजार घनमीटर पाणी अडेल एवढे काम केले आहे. हे काम राज्यातील जनतेच्या डोळय़ात अंजन घालणारे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले. पातूर तालुक्यातील बुलडाणा जिल्ह्याला लागून असलेल्या चारमोळी या गावात झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी केल्यानंतर गावकर्‍यांशी बोलताना डॉ. पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. चारमोळी या १२५ घर आणि साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या गावाने पाणी फाउंडेशन कपमध्ये सहभाग नोंदविला आहे. ८ एप्रिलपासून संपूर्ण गाव श्रमदानासाठी डोंगरकड्यावर काम करीत आहे. देवकाबाई जगदीश खुळे, सिद्धार्थ अशोक कवडे, मुरलीधर राघोजी शेळके, रामदास नामदेव शेळके यांना वॉटर कप फाउंडेशनकडून प्रशिक्षण मिळाले. प्रशिक्षण मिळाल्यापासून गावाला एकत्र करणे, पाण्याचे महत्त्व सांगून ही चळवळ उभी करून रोज पहाटेपासून ३00 लोक गावशिवारात श्रमदानासाठी बाहेर काढण्याचे मोठे काम यांनी केले. वॉटर कपसाठी केवळ तीन हजार घनमीटर काम अपेक्षित असताना यांनी सहा हजार घनमीटर काम केले आहे. शेकडो चर, अनेक दगडी बांध, मातीचे बांध निर्माण करून डोळे दिपावेत एवढे चांगले काम या ग्रामस्थांनी केले आहे. हे काम पाहण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील शनिवारी सकाळी या गावाच्या शिवारात आले. तीन मोठमोठय़ा डोंगरावर पाषाण फोडून तयार केलेले चर, मातीचे बांध, डोंगरातून येणारे पाणी गोटे टाकून जागोजागी निर्माण केलेले बांध पाहिले आणि गावकर्‍यांच्या पाठीवर शाबासकीचा हातच फिरविला नाही, तर या कामासाठी लागणारी मदत जिल्हा वार्षिक योजनेतून तातडीने देण्याचे आश्‍वासन दिले. दूध उत्पादन वाढीसाठी जनावरे, या गावातील महिलांच्या बिबे फोडण्याच्या व्यवसायासाठी यंत्र पुरविण्याचे काम शासन करेल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी तहसीलदार रामेश्‍वर पुरी, गावचे सरपंच, तालुका कृषी अधिकारी, विविध विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.