शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वोपचार’मध्ये रुग्ण सेवेचा भार इंटर्न्स, परिचारिकांवर

By admin | Updated: May 4, 2017 14:31 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण सेवेचा भार मुख्यत्वे आंतरवासिता डॉक्टर आणि परिचारिका यांच्या खांद्यावरच असल्याचे चित्र आहे.

अकोला : केवळ अकोलाच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम विदर्भातील गोरगरीब जनतेसाठी मोफत उपचाराचे मोठे केंद्र असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण सेवेचा भार मुख्यत्वे आंतरवासिता डॉक्टर आणि परिचारिका यांच्या खांद्यावरच असल्याचे चित्र आहे. प्रत्येक विभागासाठी असलेले वैद्यकीय अधिकारी येथे नावापुरतीच हजेरी लावत असल्याने रुग्णांच्या तपासणीपासून तर इतर सर्व प्रकारचे उपचार शिकाऊ डॉक्टर व परिचारिकांकडूनच केल्या जात असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.शासनाचे वेतन घेऊनही काही डॉक्टर शासकीय रुग्णालयांमध्ये कमी अन् स्वत:च्या रुग्णालयांमध्ये अधिक दिसून येतात. शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देऊन शासकीय वेतन लाटणाऱ्या डॉक्टरांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास शासनाने मज्जाव केला; परंतु अनेक डॉक्टर सर्रास वैद्यकीय अधिनियमाचे उल्लंघन करून स्वत:च्या रुग्णालयांमध्ये व्यवसाय करीत आहेत. एवढेच नाही, तर काही डॉक्टर शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार न करता त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार, शस्त्रक्रिया करण्याचे सुचवितात. अनेक डॉक्टर केवळ नावापुरती हजेरी लावून, नंतर दिवसभर आपल्या रुग्णालयांमध्ये व्यस्त राहत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक कक्षात आंतरवासिता डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावरच रुग्णांची जबाबदारी असते. रात्रपाळीत कक्षसेवक, अटेन्डंट राहतात गायबआंतरवासिता डॉक्टर व परिचारिका रुग्णांना बरे करण्यासाठी सतत परिश्रम घेतात; मात्र काही कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा व कामचुकारपणामुळे परिचारिकांवर ताण वाढविला आहे. रात्रपाळीत अटेन्डंट, कक्षसेवक, स्वीपर, सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे; मात्र महिनाभरातून क्वचितच हे कर्मचारी उपस्थित राहत असल्याच्या तक्रारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत सर्वच कामाची धुरा परिचारिकांना सांभाळावी लागत आहे.