शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नामसाम्य ट्रेड मार्कचा गैरवापर करणाऱ्या फर्मला चपराक

By admin | Updated: July 6, 2017 01:26 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशाने जिल्हा न्यायालयाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नामसाधर्म्य असलेल्या ट्रेडमार्कचा गैरवापर करून फापडा पावडर बाजारपेठेत विकणाऱ्या अकोल्यातील एका फर्मला न्यायालयाने जबर चपराक दिली आहे. ट्रेड मार्कचा यापुढे वापर करू नये, असे आदेश २० जून रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने दिले.अकोल्यातील दाळ आणि बेसन राज्य आणि राज्याबाहेर सुप्रसिद्ध आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये १९९१ पासून न्यू दिनार ट्रेडिंगचे उद्योजक मोहम्मद युसूफ अ. गफ्फार यांचे फाफडा पावडर एका फर्मच्या नावाने नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे; मात्र गेल्या दोन वर्षांपासून के.टी. फूड प्रोडक्टचे संचालक रमेश लुल्ला नामसाधर्म्य असलेले ट्रेडमार्क वापरून फापडा पावडर बाजारपेठेत आणले. त्यामुळे बाजारपेठेतील मूळ ट्रेडमार्कवर विपरीत परिणाम झाला. उद्योजक मोहम्मद युसूफ यांनी लुल्ला यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र लुल्ला यांनी काहीही ऐकले नाही. त्यानंतर युसूफ यांंनी २० जून १६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली; मात्र त्याची दखलही कोणी घेतली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या युसूफ यांनी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. त्यावर न्यायालयाने युसूफ यांची याचिका दाखल करून घेऊन नामसाम्य ट्रेड वापरणाऱ्या लुल्ला यांना समन्स बजावून निकाल लागेपर्यंत फापडा पावडरचे उत्पादन करू नये, असे अंतरिम आदेश २३ जानेवारी १७ रोजी बजाविले. त्यानंतर लुल्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयाने एका महिन्याच्या आत लुल्ला यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे निर्देश ६ जून १७ रोजी जिल्हा न्यायालयास दिले. त्यानंतर २० जून १७ रोजी न्यायमूर्ती भालचंद्र यांच्या न्यायालयाने ट्रेंड मार्कचा गैरवापर केल्याचा ठपका लुल्ला यांच्यावर ठेवून नामसाम्य असलेल्या ट्रेड मार्कचा वापर करू नये, असे आदेश दिले. युसूफ यांच्याकडून अ‍ॅड जी.के. सारडा यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.