शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाई नाकारणार्‍या विमा कंपनीला चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:15 IST

नुकसान भरपाई देण्यास नकार देणार्‍या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक मंचाने चपराक देत ग्राहकाला ५७ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुरुवारी जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.

ठळक मुद्देग्राहक मंचाचा आदेश ५७ हजारांची भरपाई द्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नुकसान भरपाई देण्यास नकार देणार्‍या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक मंचाने चपराक देत ग्राहकाला ५७ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुरुवारी जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.शास्त्री नगरातील रहिवासी शंकरलाल एच. काबरा यांनी खामगाव येथील गोदामाचा १५ मे २0१५ रोजी विमा काढला होता. एक वर्षानंतर या विम्याची मुदत संपल्याने त्याचे नूतनीकरण केले. दरम्यान, २५ मार्च २0१६ रोजी एका ट्रकने या गोदामाला धडक दिली. यामध्ये गोदामाचे नुकसान झाले. शासकीय निरीक्षक यांनी नुकसानाची पाहणी केल्यानंतर १ लाख २0 हजार ५३८ रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल विमा कंपनीला दिला. त्यानुसार शंकरलाल काबरा यांनी नॅशनल इन्श्युरन्स विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केला; परंतु त्यांचा अर्ज विमा कंपनीने नामंजूर केला. शेवटी काबरा यांनी जिल्हा ग्राहक मंचांकडे २९ डिसेंबर २0१६ रोजी तक्रार अर्ज दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य भारती केतकर, डब्यू. व्ही. चौधरी यांच्या समक्ष झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐक ल्यानंतर ग्राहक मंचने नॅशनल इश्युरन्स विमा कंपनीला चपराक देत ग्राहकास ५0 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तक्रारकर्त्यास मानसिक व शारीरिक त्रास झाल्यामुळे पाच हजार रुपये आणखी नुकसान भरपाई आणि न्यायालयीन खर्च २ हजार रुपये अशा ५७ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश दिले. काबरा यांच्यावतीने अँड. शिवम एस. शर्मा, अँड. अभय आर. रणपिसे यांनी कामकाज पाहिले.