शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षेच्या मूल्यमापन पद्धतीत बदल होणार, सूचना मागविल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 11:12 IST

मूल्यमापन चाचणी आॅनलाइन असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देडोंगराळ व ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मूल्यमापन चाचणी घेताना, त्रास सहन करावा लागला.मूल्यमापन पद्धतीमध्ये काही बदल करण्याचा विचार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.मंडळांच्या विषय योजना तसेच मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी २९ सदस्यांची समिती गठित केली आहे.

अकोला: इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने मूल्यमापन चाचणी सुरू केली आहे; परंतु या मूल्यमापन पद्धतीमध्ये काही बदल करायचे असल्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यभरातून पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक लिंक देण्यात आली असून, त्यावर सूचना बोलाविल्या आहेत.दहावीतील विद्यार्थ्यांच्या निकालात वाढ व्हावी, त्यांची गुणवत्ता वाढावी या दृष्टिकोनातून दहावी परीक्षेपूर्वी शिक्षण विभागाकडून गतवर्षी मूल्यमापन चाचणी घेण्यात आली. शहरातील विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली. मूल्यमापन चाचणी आॅनलाइन असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. डोंगराळ व ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मूल्यमापन चाचणी घेताना, त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या मूल्यमापन पद्धतीमध्ये काही बदल करण्याचा विचार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सीबीएसई, आयसीएसई, आयबी या मंडळांच्या विषय योजना तसेच मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी २९ सदस्यांची समिती गठित केली आहे. या समितीने राज्यभरातून पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञ, संस्थाचालक, अभ्यासक्रम समिती सदस्यांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यासाठी एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत सूचना सादर करायच्या आहेत. असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक (समन्वय) विकास गरड यांनी कळविले.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र