शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका प्रशासनात खांदेपालट; कारभार ताळ्यावर आणण्यासाठी आयुक्तांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:56 IST

अकोला : महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासंदर्भात मनपा आयुक्त जितेंद्र वाघ शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करीत असल्याचे दिसून येत आहे

ठळक मुद्देमनपाच्या स्तरावर उपलब्ध असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपायुक्तांसह विविध विभागाचा अतिरिक्त पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.पीडीकेव्हीतील वित्त नियंत्रक विद्या पवार यांच्याकडे मुख्य लेखाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. उपायुक्त प्रशासन आणि उपायुक्त विकास ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे.

अकोला : महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासंदर्भात मनपा आयुक्त जितेंद्र वाघ शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करीत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रासह राज्यात व महापालिकेत मोठ्या अभिमानाने सत्ता असण्याचा गवगवा करणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात मनपाची वाटचाल अतिशय बिकट झाली असून, प्रशासकीय कारभार ताळ््यावर आणण्यासाठी मनपा आयुक्त वाघ धडपड करताना दिसत आहेत. मंगळवारी मनपाच्या स्तरावर उपलब्ध असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपायुक्तांसह विविध विभागाचा अतिरिक्त पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.महापालिकेतील दोन्ही उपायुक्त पदे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी तत्कालीन मुख्य लेखाधिकारी सुरेश सोळसे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सोपवला होता. मुख्य लेखाधिकारी सोळसे यांचे निधन झाल्यानंतर हे पदही रिक्त होते. परिणामी मनपाचा आर्थिक व्यवहार पूर्णत: ठप्प झाला होता. यासंदर्भात ओरड झाल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी नगर विकास विभागाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर पीडीकेव्हीतील वित्त नियंत्रक विद्या पवार यांच्याकडे मुख्य लेखाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. सद्यस्थितीत उपायुक्त प्रशासन आणि उपायुक्त विकास ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, नगररचनाक ार विजय इखार प्रदीर्घ रजेवर गेले. त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचनाकार संजय पवार यांच्याकडे सोपवून वेळ निभावल्या जात आहे. अशा बिकट परिस्थितीमुळे प्रशासनाचा सर्व भार एकमेव आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या खांद्यावर आला आहे. रिक्त पदांसंदर्भात नगर विकास विभागाकडे वारंवार पत्र, शिफारशी केल्यानंतरही शासन निर्णय घेत नसल्याने अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. असे असले तरी कामकाज थांबवता येत नसल्यामुळे नाईलाजाने मनपा आयुक्त वाघ यांनी स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विश्वास दर्शवित प्रशासनाचे गाडे हाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनच मंगळवारी प्रशासनात खांदेपालट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येते.

मनपाकडे डॉ. दीपाली भोसलेंचा पर्याय!आजरोजी मनपात शासनाचे अधिकारी म्हणून केवळ आयुक्त जितेंद्र वाघ व सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले कार्यरत आहेत. डॉ. भोसले यांचा परिविक्षाधीन कालावधी संपुष्टात येण्यास काही दिवस शिल्लक आहेत. प्रशासनाकडे इतर कोणताही पर्याय नसल्यामुळे डॉ. भोसले यांच्याकडे उपायुक्त (सामान्य प्रशासन विभाग) पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरसचिव अनिल बिडवे यांच्याकडे उपायुक्त (विकास) पदाचा अतिरिक्त पदभार दिला असून, मुख्य लेखा परीक्षक एम.बी. गोरेगावकर यांच्याकडे शिक्षणाधिकारी तसेच दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर यांच्याकडे पश्चिम झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका