शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या सहभागातही होणार बदल!

By admin | Updated: July 2, 2016 02:19 IST

अकोला जिल्हा परिषदेच्या सभापती पदांसाठी १२ जुलैला निवडणूक.

संतोष येलकर /अकोलाजिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर चार सभापती पदांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय धुव्रीकरण झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या सहभागातही बदल होणार आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सत्तेत भारिप-बहुजन महासंघासोबत काँग्रेसचा सहभाग होता. आरोग्य व अर्थ विभागाचे सभापती पद काँग्रेसकडे होते. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी घेण्यात आली. या निवडणुकीत सत्ताधारी भारिप-बमसंची साथ सोडून काँग्रेस पक्ष शिवसेना-भाजप व दोन अपक्ष मिळून तयार झालेल्या महाआघाडीसोबत राहिला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्मणराव अरबट आणि शिवसेनेच्या एक सदस्य माधुरी गावंडे या दोन सदस्यांनी भारिप-बमसंच्या उमेदवारांना मतदान केले. दोन्ही पदांवर विजय प्राप्त करीत भारिप-बमसंने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय ध्रुवीकरणामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेच्या सहभागातही बदल होणार आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य व अर्थ आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी १२ जुलै रोजी संपत आहे. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन चार सभापतींची निवड १२ जुलै रोजी करण्यात येणार आहे. सभापती पदांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सत्तेतील सहभागातही बदल होणार आहे. त्यामध्ये अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वपक्षाव्यतिरिक्त इतर दोन सदस्यांनी केलेल्या मतदानाच्या बदल्यात भारिप-बमसंकडून कोणाकोणाला सभापती पद दिले जाते, याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.