शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन चेह-यांमध्ये लढत होण्याची शक्यता !

By admin | Updated: September 22, 2014 01:28 IST

अकोला पश्‍चिम मतदारसंघात कॉँग्रेस, भाजपकडून चाचपणी.

अकोला: जात, धर्माच्या आधारे मतदान होणार्‍या आणि मुलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेल्या अकोला पश्‍चिम मतदारसंघात कॉँग्रेस आणि भाजपकडून यावेळी नवीन चेहरा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात मुख्य लढत दोन नवीन चेहर्‍यांमध्ये होण्याची शक्यता आहे.विधानसभेच्या अकोला पश्‍चिम मतदारसंघातील लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत मूलभूत सुविधा, विकासाच्या मुद्याला बगल दिली जाते. गत दीड दशांकापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात हिंदू, मुस्लीम तसेच दलित मतदारांचे कमी जास्त प्रमाणात प्राबल्य आहे. विकासाच्या मुद्यावर या मतदारसंघात भाजपबाबत उघड-उघड नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने मतदारसंघनिहाय सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये अकोला पश्‍चिमचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. तसेच आमदार शर्मा हे निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते आहे. परिणामस्वरुप दुसर्‍या फळीतील हरिष आलिमचंदानी, महानराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, अँड. मोतिसिंह मोहता यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली. पक्षश्रेष्ठींकडून हरिष आलिमचंदानी, यांच्या रुपात नवीन चेहर्‍याला संधी देण्याचा विचार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कॉँग्रेसमध्येही बदलाचे वारे वाहत आहेत. अल्पसंख्यांक मतांचे विभाजन टाळण्यासाठी पक्षातील एका गटाने डॉ. झिशान हुसेन यांचे नाव पुढे आहे. तसेच मराठा मतांवर डोळा ठेवून कॉँग्रेसमधील गट विजय देशमुख यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होत आहे. एकूणच कॉँग्रेस आणि भाजप यावेळी नवीन चेहर्‍याला संधी देणार असल्याची शक्यता आहे.