शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुणे संघ विजेता

By admin | Updated: December 14, 2014 23:34 IST

अकोला येथील ५१ वी पुरुष व २७ वी महिला ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धा: शशीकांत व दीपाली बेस्ट वेटलिफ्टर.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरी सदन येथे आयोजित ५१ वी पुरुष व २७ व्या महिला ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेचे विजेतेपद पुणे संघाने पटकाविले. पुरुषांच्या स्पर्धेचे उपविजेतेपद महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनी पुणे तर महिलांच्या स्पर्धेतील उपविजेतेपद नाशिक जिल्हा संघाने मिळविले. शशीकांत कदम व दीपाली गुरसाळे बेस्ट वेटलिफ्टिर ठरले. रविवारी झालेल्या अंतिम फेरीमध्ये ६३ किलो वजनगटात नाशिकच्या निकीता काळे हिने प्रथम स्थान पटकाविले. सातार्‍याची सोनाली गवळी दुसर्‍या स्थानावर राहिली. पुण्याची तैसिम शेख हिने तिसरे स्थान पटकाविले. ६९ किलो वजनगटात सातार्‍याच्या मयूरी देवरे हिने नाशिकच्या श्रद्धा माळवतकरचा पराभव करीत सुवर्णपदक मिळविले. पुण्याची शरयू काळे हिने तृतीय स्थान मिळविले. ७५ किलो वजनगटात महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनीची कांचन टिकमकर प्रथम तर तिचीच संघ सहकारी किरण जोतवाणी हिने दुसरे स्थान मिळविले. ७५ किलोच्या वर वजनगटात कोल्हापूरची अश्‍विनी मळगे प्रथम, ठाण्याची आशिका भोईर द्वितीय आणि नाशिकची रेणुका नलावडे हिने तृतीय स्थान पटकाविले. स्पर्धेत २२४ पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते.स्पर्धा समाप्तीनंतर लगेच झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला शिवसेना निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, सामाजिक कार्यकर्ते राजू दहातोंडे, महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष वरुण अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते एन.के.देशमुख, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त मधुरा सिंहासने, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत चोखळकर, अकोला जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुशील मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना पदक बहाल करण्यात आले