शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ९0 कोटी रुपये खर्चाचे आव्हान

By admin | Updated: February 29, 2016 02:34 IST

अकोला जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत १५७ कोटींपैकी केवळ ६७ कोटी खर्च झाले.

संतोष येलकर /अकोलाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हय़ात विविध योजना आणि विकासकामांसाठी १५७ कोटी ९४ लाख ३ हजार रुपयांचा निधी मंजूर असला तरी, जानेवारी अखेरपर्यंत ६७ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांची निधी खर्च करण्यात आला आहे. ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ महिनाभराचा कालावधी उरला असल्याने, जिल्हा वार्षिक योजनेचा उर्वरित ९0 कोटी ९१ लाख ६ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध विभागांमार्फत योजना राबविण्यासह विकासकामे केली जातात. त्यासाठी सन २0१५-१६ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १५७ कोटी ९४ लाख ३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी प्राप्त १४८ कोटी ९४ लाख ८१ हजार रुपयांच्या तरतुदीपैकी १२२ कोटी ६४ लाख ६२ हजारांचा निधी जिल्हा नियोजन विभागामार्फत संबंधित विभाग आणि यंत्रणांना वितरित करण्यात आला. वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा योजनेंतर्गत ६७ कोटी २ लाख ४३ हजारांचा निधी खर्च करण्यात आला. मंजूर निधीच्या तुलनेत उर्वरित ९0 कोटी ९१ लाख ६ हजारांचा निधी खर्च होणे अद्याप बाकी आहे. मार्चअखेरपर्यंत (मार्च एन्ड) निधी खर्च करावयाचा आहे. त्यासाठी आता केवळ महिनाभराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ९0 कोटी ९१ लाख ६ हजारांचा निधी महिनाभरात खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.